पुणे : सीएनजी पंपावर गॅस भरत असताना अचानक नोझल उडल्याने कामगाराचा डावा डोळा निकामी झाल्याची घटना धनकवडी भागात घडली. नोझल उडाल्याने कामगाराच्या डाव्या डाेळ्यावर आदळले. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सीएनजी पंप मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेत हर्षद गणेश गेहलोत (वय २३, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) याचा डोळा निकामी झाला आहे. गेहलोत याने याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सीएनजी पंप मालकासह व्यवस्थाापक धैर्यशील पानसरे, राहीत हरकुर्की यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धनकवडीतील तीन हत्ती चौकातील एस स्क्वेअर सीएनजी पेट्रोल पंपावर ही घटना घडली.

हेही वाचा : पिंपरी : बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलिंडरची टाकी डोक्यात घालून खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीतील तीन हत्ती चौकात एस स्क्वेअर हा सीएनजी पंप आहे. तेथे हर्षद गेहलोत हा गेल्या वर्षभरापासून काम करत आहे. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तो एका गाडीमध्ये सीएनजी गॅस भरत होता. त्यावेळी गॅसचे नोझल उडून गेहलोत याच्या डाव्या डोळ्यावर आदळले. दुर्घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा डोळा निकामी झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सीएनजी पंपाचे मालक, तसेच व्यवस्थापकाने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडली, असे गेहलोत याने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस कर्मचारी चव्हाण तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune worker lost his eye after gas tank nozzle hit on his eye at cng gas station pune print news rbk 25 css