पुणे : किरकोळ वादातून येरवडा कारागृहातील कैद्याला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन कैद्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुधीर गौतम थोरात असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कारागृहातील कैदी विकी उर्फ विवेक राजेश खराडे, अली अदम शेख यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत कारागृहातील रक्षक विश्वास वाकडे (वय ४३) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील बराकीत १४ डिसेंबर राेजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कैदी सुधीर थोरात याला विकी खराडे, अली शेख यांना अडवले. ‘कारागृहातून कधी सुटणार?’, अशी विचारणा केली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील शासकीय अधिकारी पुण्यात येणार एकत्र ! नक्की काय आहे कारण..

वादातून खराडे आणि शेख यांनी थोरात याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत थोरात याची बरगडी, तसेच नाकाला दुखापत झाली. कारागृहात हाणामारी झाल्याची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी त्वरीत तेथे धाव घेतली. थोरातला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर प्रथमोपाचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेच्या निरीक्षक पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर यांनी कारागृहास भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत. येरवडा कारागृहात यापूर्वी कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. हाणामारीच्या घटना, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune yerawada central jail clashes between prisoners case registered against two prisoners pune print news rbk 25 css