पुणे : आयुर्विमा पाॅलिसीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तरुणीची १३ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी वानवडीतील परमार पार्क परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी पाच महिन्यांपूर्वी तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका आयुर्विमा कंपनीतील प्रतिनिधी असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. एका खासगी कंपनीच्या आयुर्विमा पाॅलिसीच्या वार्षिक भरण्याबाबत विचारणा केली. चोरट्यांनी बतावणी करुन तरुणीच्या बँक खात्याची माहिती घेतली. पाॅलिसीतील काही रक्कम परताव्यापोटी देण्यात येणार आहे, अशी बतावणी करुन चोरट्यांनी तरुणीच्या बँक खात्याची माहिती घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात तरुणीने वेळोवेळी १३ लाख ३२ हजार रुपये जमा केली. त्यानंतर चोरट्यांनी तरुणीला आणखी रक्कम पााठविण्यास सांगितले. संशय आल्याने तिने चाैकशी केली. तेव्हा फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. आयुर्विमा पाॅलिसी बंद पडली आहे. पाॅलिसी सुरू करण्यासाठी तातडीने काही रक्कम भरावी लागेल, अशी बतावणी करुन सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सायबर चोरट्यांनी अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली आहे.