पुणे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार, तसेच धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षकाने तरुणीला धमकावून जामखेड परिसरातील एका रुग्णालयात गर्भपात केल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. किरण माणिक महामुनी (वय ३८, रा. नागपूर) असे गुन्हा दाखल केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी पोलीस भरतीची तयारी करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे: रेल्वे प्रवाशांची रोजचीच लढाई! तिकीट असूनही गाडीत चढता येईना…

महामुनीशी तिची ओळख झाली होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. महामुनीने तिच्यावर शिवाजीनगर भागातील घरी वेळोवेळी बलात्कार केला. तरुणी गर्भवती झाली. त्यानंतर त्याने तिला नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात असलेल्या एका रुग्णालयात नेले. तेथे तिला धमकावून गर्भपात केला, असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. तरुणीने नुकतीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune young girl preparing for police recruitment raped by police sub inspector at shivajinagar pune print news rbk 25 css