पुणे : तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बजरंग जयवंत रुमाले (वय २१) आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीचे आजोबा नांदेड येथे राहायला होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अतिक्रमण विरोधी पथकातील सहायक निरीक्षकाला कानाखाली मारली; बेकायदा पथारी लावणाऱ्या महिलेवर गुन्हा

आजोबांचे निधन झाल्याने ती नांदेडला गेली होती. नांदेड येथे आरोपी रुमालेशी तिची ओळख झाली. आजोबांच्या निधनानंतर तरुणी पुण्यात परतली. त्यानंतर रुमाले आणि त्याचा मित्र पुण्यात आले. तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीला धमकावून रुमालेने बोपदेव घाटात नेले. तिच्यावर बलात्कार करुन अनैसर्गिक कृत्य केले. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune young girl raped by 2 boys at bopdev ghat police case registered pune print news rbk 25 css