पुणे : इमारतीच्या बांधकामावेळी सातव्या मजल्यावरून लिफ्टच्या मोकळ्या जागेमध्ये (डक्ट) पडल्यामुळे १९ वर्षीय तरूण मजुराचा मृत्यू झाला. ही घटना २४ नोव्हेंबरला संध्याकाळी सातच्या सुमारास येवलेवाडीतील एका बांधकामस्थळी घडली. याप्रकरणी एकाविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी डाक्टर सोनी (वय १९ रा. लेबर कॉलनी, येवलेवाडी ) असे ठार झालेल्या तरूण मजुराचे नाव आहे. याप्रकरणी डाक्टर सोनी (वय ४१ रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे : स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री, दोन जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडीत पिरॅमिड कन्स्ट्रक्शन साईटवर बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी तक्रारदार सोनी यांचे कुटुंबीय कामाला असून लेबर कॉलनीत राहायला आहे. ४ नोव्हेंबरला संध्याकाळी सातच्या सुमारास सनी हा इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेला होता. त्यावेळी लिफ्टसाठी ठेवलेल्या मोकळ्या जागेत पडून तो गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान १९ डिसेंबरला त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, कामगारांच्या सुरक्षिततेबाबत हयगय केल्याप्रकरणी संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune young labor died after fall into the duct of lift at construction site yewalewadi pune print news vvk 10 css