पुणे : महाविद्यालयीन तरुणीची मोबाइलवर चित्रफीत काढून तरुणाने सतत धमकावून तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकास अटक केली.

कपिल रवींद्र वाल्हेकर (वय १८, रा. कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी कपिलने वर्षभरापूर्वी तिच्याशी ओळख केली. तिला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर बलात्कार केला. तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती त्याला होती. त्यानंतर त्याने तरुणीकडे मोबाइलवर चित्रीकरण करण्याची मागणी केली. तरुणीने त्याला नकार दिला.

हेही वाचा…पुणे : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल… जाणून घ्या पर्यायी मार्ग

तरुणीने नकार दिल्यानंतर तो तिच्यावर चिडला होता. तरुणी एकटी घरी असताना त्याने प्रसाधनगृहातील खिडकीची काच सरकवून तरुणीचे मोबाइलवर चित्रीकरण केले. त्याने तरुणीला चित्रफीत दाखविली. त्याने तिला धमकावून पुन्हा बलात्कार केला. ८ एप्रिल रोजी तरुणीला पुन्हा भेटायला बोलाविले. त्याने तिला पुन्हा धमकावले. त्याच्या त्रासामुळे तरुणीने विषारी ओैषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

हेही वाचा…शरद पवार यांचा बेरजेच्या राजकारणावर भर, तब्बल पाच दशकाने घेतली काकडे कुटुंबियांची भेट

तिला तिच्या कुटुंबीयांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर तिला रुग्णलायातून घरी सोडण्यात आले. शुक्रवारी (१२ एप्रिल) आरोपी कपिलने पुन्हा तरुणीशी संपर्क साधला. तरुणीने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. कपिलला तिने घरी बोलावून घेतले. आई-वडिलांनी त्याला जाब विचारला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. कपिलला अटक करण्यात आली असून, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनाली कथले तपास करत आहेत.

Story img Loader