पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. गणेश पेठेतील बुरुड गल्लीमधील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली. सिद्धार्थ नंदकुमार हादगे (वय २९, रा. बुरुड आळी, गणेश पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी हर्षल पवार आणि साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : पुणे: नवले पुलाजवळ तरुणाचा डोक्यात दगड घालून खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हादगे याचे हर्षल पवार आणि त्याच्या साथीदाराशी किरकोळ वाद झाले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास तो घराजवळ थांबला होता. पवार आणि त्याचे साथीदार कोयते घेऊन आले. त्यांना पाहून सिद्धार्थ ओसवाल बिल्डिंगमध्ये शिरला. तो पळत पळत छतावर गेला. तेथे हल्लेखोरांनी त्याला गाठून कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा तपास करत आहेत.