पुणे : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. टोळक्याने कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी तिघांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महंमद प्यारे शेख (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अरबाज उर्फ लॅब याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेख याने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरबाज याच्या साथीदाराचे घर पोलिसांना दाखविल्याचा संशय आरोपींना होता. आरोपी शेखवर चिडले होते. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेख कोंढव्यातील कोणार्क पुरम सोसायटीच्या परिसरातून निघाला होता. तेथील रिक्षा थांब्याजवळ आरोपी अरबाज आणि साथीदारांनी त्याला अडवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : पिंपरी: नवजात बालक जिवंत असताना डॉक्टरांनी बनवला स्मशान दाखला; Ycm मधील धक्कादायक घटना

‘तू तबरेजचे घर पोलिसांना का दाखविले?,’ अशी विचारणा करून आरोपींनी शेखवर कोयत्याने वार केले. शेख याच्या डोक्यावर वार केल्याने तो जखमी झाला. त्यावेळी रिक्षा थांब्याजवळ असलेल्या नागरिकांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना धमकावले. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune young man stabbed with koyta on suspicion of being a police informer pune print news rbk 25 css