पुणे : अमली पदार्थ विरोधी विभागाकडून (एनसीबी) कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी भारती विद्यापीठ परिसरातील एका तरुणाची २० लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कात्रज भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर २९ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला. अमली पदार्थ विक्री प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो-एनसीबी) कारवाई करण्यात येणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी बतावणी चोरट्याने त्याच्याकडे केली. त्यानंतर चोरट्याने तरुणाला तातडीने एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले.

Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
fraud of rs 15000 crores in state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर
Cash worth Rs 3 lakh stolen from school on Law College Road Pune news
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
fir against against five for selling nylon manja
नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हे
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय

हेही वाचा : पिंपरी : बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलिंडरची टाकी डोक्यात घालून खून

तरुणाने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात वेळोवेळी २० लाख ९० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यनंतर चोरट्यांनी पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. चौकशीत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कारवाईची भीती दाखवून नागरिकांची सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. चोरट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

हेही वाचा : पिस्तूल बाळगणारे सराइत अटकेत, सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात कारवाई

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत महिलेसह दोघांची २९ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाषाण भागातील एका महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी १९ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केली. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी ओैंध भागातील एकाची नऊ लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली.

Story img Loader