पुणे: सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागात तरुणावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. भरदिवसा तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध हवेली पोलिसांकडून गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश सुदाम थोपटे ( वय ३८, सध्या रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी खडकवासला, मूळ रा. खानापूर, ता. हवेली: असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. थोपटे हा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करायचा. त्याच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. थोपटे बुधवारी दुपारी कोल्हेवाडी भागात थांबला होता. त्यावेळी टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात थोपटे गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले

हेही वाचा : आळंदीत माउलींचा रथोत्सव; वारकरी भक्तिरसात चिंब

थोपटे याच्या नावावर सदनिका खरेदीसाठी एकाने २५ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांच्यात वाद झाला होता. आर्थिक वादातून थोपटे याचा खून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे, असे पोलीस निरीक्षक वांगडे यांनी सांगितले. पसार झालेल्या हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. थोपटे याच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.