शिरुर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी त्याच बरोबर या प्रकरणातील आकावर ही कारवाई करावी अशी मागणी करीत संतोष देशमुख यांच्या मारेकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन शिरुर येथे करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय च्या घोषणा बरोबर , सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा झालीच पाहीजे अश्या ही घोषणा देण्यात आल्या.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अंत्यत निर्घूणपणे व अमानुषपणे करण्यात आली असून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी. जलद न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी व्हावी . कोणाच्या दबावाला बळी न पडता शासनाने या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
हॉटेल आस्वाद जवळ हे आंदोलन करण्यात आले . यावेळी आखिल भारतीय मराठा महासंघाचे श्यामकांत वर्पे , महिला आघाडी तालुकाध्यक्ष अर्चना डफळ , संघटक आशा ढवण , माजी अध्यक्षा शशिकला काळे , जनता दलाचे संजय बारवकर , समस्त मराठा समाज संघचे विश्वस्त व माजी उपसरपंच संभाजीराव कर्डिले, रामभाउ इंगळे , संजय माशेरे , महेंद्र ढेरे , अखिल भारतीय मराठा महासंघ युवा आघाडीचे राहुल शिंदे , शिरुर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आप्पा वर्पे , मुकेश पाचर्णे , भरत ढाके , संतोष झांबर , पकंजराव जाधव आदी यावेळी उपस्थित होते