शिरुर : नातेवाईकांचे लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून पत्नीचा खून केल्याचा प्रकार गणेगाव खालसा येथे घडला आहे. मीनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे वय २७ वर्ष सध्या राहणार -गणेगाव तालुका -शिरूर जिल्हा -पुणे मुळ गाव -दडपिंपरी तालुका- चाळीसगाव जिल्हा- जळगाव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे .

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेल्या महिलेच्या चुलत भाउ ताराचंद सुकलाल मोरे ( वय – २६ )वर्ष व्यवसाय -मजुरी राहणार- गणेगाव खालसा वरुडे रोड तालुका- शिरूर जिल्हा- पुणे. मुळगाव -सिदवाडी, तालुका -चाळीसगाव जिल्हा -जळगाव यांनी यासंदर्भात आरोपी- ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे रा-गणेगाव खालसा याच्या विरोधात फिर्याद दिली आहे .

१२ फेबृवारीला गणेगाव येथील सुभाष बाबू काळे यांची जमीन गट क्रमांक ३३३/४ मधील मोकळे जागेत ज्ञानेश्वर गांगुर्डे याने त्यांची पत्नी मीना हीने नाशिक येथे त्यांचे नातेवाईकांचे लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून तीचा गळा आवळून तीचा खून केला. अशी फिर्याद ताराचंद सुखलाल मोरे यांनी दिले असून आरोपी ज्ञानेश्वर गांगुर्डेचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिली . आधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे करीत आहे.

आरोपी ज्ञानेश्वर गांगुर्डे हा गुन्हा करून फरार झालेला आहे, पोलीस स्टेशन कडील तपास अधिकारी व डीबी पथक हे आरोपीचा शोध घेत आहे .

Story img Loader