शिरुर : ‘हर हर महादेव ‘, ‘ प्रभू रामलिंग महाराज कि जय ‘ , ‘ ओम नम : शिवायच्या जयघोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिरुर पंचक्रोशीचे आराध्य दैवत असणा- या प्रभू रामलिंगाच्या पालखी सोहळ्याने प्रस्थान केले .
पालखी मार्गावर सर्वत्र भगव्या पताका व झेंडे लावण्यात आले होते. तर रामलिंग मंदिरा कडे जाणा -या रस्त्यांवर ही ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत .
शिरुर पंचक्रोशीचे रामलिंग महाराज हे आराध्य दैवत असून दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भव्य अशी यात्रा शिरुर रामलिंग या ठिकाणी भरत असते. तीन दिवस चालणा- या या यात्रेतील महाशिवरात्र हा मुख्य दिवस असतो. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिरुर शहरातून रामलिंग महाराजाची पालखी निघते तर महाशिवरात्रीच्या दुसरा दिवशी बैलगाड्या शर्यतीने यात्रेची समाप्ती होते. शहरातील पुणे नगर रस्त्यावरील शिवसेवा मंदिर याठिकाणी रामलिंग महाराजाची पुजा व आरती झाल्या नंतर पालखी सोहळ्याने प्रस्थान केले. प्रस्थानाचा वेळी आमदार ज्ञानेश्वर कटके ,रामलिंग देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष उद्योगपती प्रकाश धारीवाल, , माजी आमदार ॲड .अशोक पवार , उद्योगपती आदित्य प्रकाश धारीवाल , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे , घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , रामलिंग देवस्थान ट्रस्ट चे पोपटराव दसगुडे , बलदेवसिंग परदेशी, नामदेवराव घावटे, जगन्नाथ पाचर्णे , यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . जुन्या नगरपरिषदेजवळ मुख्याधिकारी प्रतिक पाटील यांनी पालखीचे स्वागत केले .
रामलिंग पालखी सोहळ्याचे महत्वाचे वैशिष्टय राज्यातील नामांकित ब्रॉस बॅण्डचा सहभाग हे असते. यंदाचा वर्षी अंबड जि. जालना येथील सरस्वती ब्रास बॅन्ड , अमर ब्रास बॅन्ड बारामती यांनी वाजविलेल्या विविध मराठी ,हिंदीतील धार्मिक गीते ,भावगीते व प्रसिध्द चित्रपटातील गीतांनी शिरुरकर मंत्रमुग्ध झाले . ब्रास बॅण्ड वादनाला उस्फूर्त अशी दाद ठिकठिकाणी मिळाली .
पालखी सोहळ्या सर्वात पुढे सनई चौघड्याचे सुमधुर वादन सुरु होते .पालखी समोर मानाचा अश्व होता तर बाल वारकरी टाळ मृदुंगाचा गजर करत होते . मारुती आळी , सरदार पेठ हलवाई चौक गणेश मित्र मंडळ हलवाई चौक , आझाद हिंद गणेश मित्र मंड्ळ सुभाष चौक ,कुंभार आळी , अजिंक्यतारा गणेश मित्र मंडळ मुंबई बाजार या ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले .
पालखी सोहळा कापड बाजार ,रामआळी ,मारुती आळी ,सरदार पेठ ,हलवाई चौक ,सुभाष चौक ,सोनार आळी ,कुंभार आळी ,मुंबई बाजार ,डंबेनाला ,आडतबाजार ,जुन्या पुणे नगर रस्त्या ,पाबळ फाटा , आनंद सोसायटी ,मोतीनाला ,या मार्गे रामलिंग मंदिर जुने शिरुर येथे जातो .पालखी मार्गावर विविध सेवाभावी व्यक्ती संस्था मंडळे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले .
रामलिंग यात्रेनिमित्त महाशिवरात्रीस म्हणजेच दिनांक २६ फेबृवारी २०२५ रोजी रामलिंग मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे . मलठन मार्ग शिरूर ला येणारी वाहतुक ही सरदवाडी मार्गे शिरूर ला येईल व शिरूर वरून जाणारी वाहतुक ही सरदवाडी मार्ग मलठन अशी वळवण्यात आलेली आहे.
रामलिंग यात्रेनिमित्त वाहतुक कोंडी टाळण्याकरीता तीन ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे त्यामध्ये शिरूर शहरामधुन रामलिंगला जाणारे भाविक हे दसगुडे मका पार्कीग – १ येथे वाहने पार्क करून एस टी बसने रामलिंग मंदिर दर्शनासाठी जातील.
टू व्हीलर, फोर व्हिलर वाहन व एस टी बस करीता बैलगाडा घाट येथे पार्कीग- २ करण्यात आलेले आहे.
सरदवाडी व मलठन येथुन येणारे भाविकांकरीता रामलिंग मंदिरासमोरील ग्रांउड मध्ये पार्किंग सुविधा करण्यात आलेली आहे. रामलिंग यात्रेनिमित्त शिरूर पोलीस स्टेशन कडुन १० पोलीस अधिकारी व १०० पोलीस अंमलदार, २ पोलीस स्ट्रींग, ५० स्वंयसेवक, १० होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले .
रामलिंग महाराज यात्रेनिमित रामलिंग मंदिरावर व परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .