बारामती : रद्द झालेल्या व्यापारी मेळाव्यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता त्यांच्याच उपस्थितीमध्ये व्यापारी मेळावा घेण्याचा निर्णय बारामती येथील व्यापाऱ्यांनी घेतला. पवार यांनी वेळ दिल्यानंतर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

आम्हाला मेळाव्याला येणे शक्य नसल्याचे पत्र व्यापाऱ्यांनी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती शहरात सोमवारी होणारा व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द करण्यात आला होता. ‘पूर्वी असे कधी घडले नव्हते’, अशा शब्दांत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे हा मेळावा रद्द करण्यासाठी बड्या नेत्याचा दबाव होता, अशी कुजबूज बारामतीत सुरू झाली.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
Sanjay Malhotra loksatta article
अन्वयार्थ : कपातपर्वाचा पायरव?
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे

हेही वाचा >>>शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय… होणार काय?

व्यापाऱ्यांशी त्यांच्या प्रश्नांसाठी मी अनेक वेळा चर्चा केली, परंतु ‘आम्हाला जमणार नाही’ असे गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी कधीच कळवले नव्हते. हे पहिल्यांदा घडले. त्यांना बहुदा कशाचीतरी चिंता वाटत असावी. त्यामुळे कार्यक्रम न घेतलेला बरा, असे त्यांना वाटले असावे. त्यांनी समोरच्याचे ऐकूनही घ्यायचे नाही असे ठरवले, त्याची मला खंत वाटते, असा तपशील शरद पवार यांनी वकिलांच्या मेळाव्यात उघड केला होता.

हेही वाचा >>>पुणे : खराडीत भरचौकात लूट; दाम्पत्याकडील आठ लाखांची रोकड दुचाकीस्वारांनी लुबाडली

त्यानंतर माजी नगराध्यक्ष जवाहर शहा वाघोलीकर यांच्या निवासस्थानी व्यापारी मेळाव्याबाबत पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाचा व्यापारी मेळावा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे, शरद पवार यांनी दिलेल्या तारखेनुसार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, असे जवाहर शहा यांनी स्पष्ट केले. यापूर्वी व्यापारी मेळाव्याबाबत नियोजित बैठक घेऊन निर्णय वेळेत न झाल्यामुळे मेळाव्याला उशीर झाला, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, माजी नगरसेवक सुभाष ढोले, राहुल शहा वाघोलीकर, बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी कर्वे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील सोमानी, नरेंद्र गुजराती, स्वप्नील मुथा, शैलेश साळुंखे, धवल वाघोलीकर उपस्थित होते.

Story img Loader