नारायणगाव : वारूळवाडी हद्दीतील पुणे – नाशिक महामार्गावरील कोठारी ऑटो व्हील्स मारुती सुझुकी शोरूम मध्ये आज (दि १३) मध्यरात्री २ वा. सुमारास अज्ञात ६ चोरटयांनी ५ लाख १२ हजार रोख रकमेची चोरी केल्याची घटना शोरुमचे तिन्ही सुरक्षा रक्षक कंपनीच्या ट्रायलसाठी असलेल्या गाड्यामध्ये झोपलेले आढळून आले आहेत .कोठारी ऑटो व्हील्स मारुती सुझुकी शोरूमचे कर्मचारी फिर्याद अभिजित भालेराव यांनी दिली आहे .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोठारी ऑटो व्हील्स मारुती सुझुकी शोरूम मध्ये अज्ञात ६ चोरटयांनी प्रवेश करून मारुती सुझुकी शोरूम मधील तळमजल्यावर असलेल्या शोरूमचे कॅशियर यांच्या केबिनचे लॉक तोडून त्यामध्ये असलेली लाकडी कपाटाला फिक्स केलेली बजाज कंपनीची तिजोरी उचकटून ती तिजोरी पहिल्या मजल्यावर नेऊन इलेट्रीक कटरच्या सहाय्याने तिजोरीच्या वरच्या भागावरील पत्रा कट करून त्यातील ५ लाख १२ हजार २३२ रु रोख चोरून नेले आहेत .घटनेची माहिती नारायणगाव पोलिसाना सकाळी ८ वा मिळाली . नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार ,पोलीस उप निरीक्षक सोम शेखर शेटे,स्थानिक गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे,अक्षय नवले ,दत्ता ढेंम्बरे यांनी पाहणी केली . दरम्यान मागील महिन्यात कोठारी ऑटो व्हील्स मारुती सुझुकी शोरूम मध्ये दि १८ जानेवारी रोजी १८ हजार रु मुद्देमालाची चोरी अज्ञात चोरटयांनी केली होती . मारुती सुझुकी शोरूम मधील तळमजल्यावर असलेल्या शोरूम मॅनेजर यांच्या केबिनचे लॉक तोडून त्यामध्ये असलेली लाकडी कपाटाला फिक्स केलेली डिजिटल तिजोरी तोडून त्यातील सुमारे ५ हजार रुपये चोरीला गेले होते. त्या घटनेनंतर आज दि १३ ला मध्यरात्री चोरीची दुसरी घटना घडली आहे.

कोठारी ऑटो व्हील्स मारुती सुझुकी व नेक्सा शोरूम च्या सुरक्षितेसाठी पुणे येथील बी एफ एस एस कंपनीचे ३ सुरक्षा रक्षक असताना सलग दोन महिन्यात दुसऱ्यांदा चोरीच्या घटना घडत आहे . हि चोरी होण्याच्या वेळी तिन्ही सुरक्षा रक्षक कंपनीच्या ट्रायलसाठी असलेल्या गाड्यामध्ये झोपलेले आढळून आले आहे .नेक्सा शोरूमचा सुरक्षा रक्षक अज्ञात चोरटे शोरूम मध्ये काचेच्या दरवाजातून आत प्रवेश करीत असताना सुमारे १० फुटावर झोपलेला होता .तर मारुती सुझुकी शोरूम मध्ये चोरटे कटरने तिजोरी तोडत असताना कोणताही आवाज या सुरक्षा रक्षकांना का आला नाही . याबद्दल सुरक्षा रक्षकांवर शंका उपस्थित केली जात आहे .

Story img Loader