पुणे : शहराचा वाढता विस्तार आणि टपाल विभागाच्या सुविधांचा लाभ स्थानिक नागरिकांना मिळावा या उद्देशातून बावधन येथे नव्या टपाल कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे पिनकोडनुसार बावधन आता पुणे ४११०७१ झाले आहे. बावधन भागातील नागरिकांना टपाल विभागाच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी दूरवरील पाषाण टपाल कार्यालयामध्ये जावे लागत होते. नव्या टपाल कार्यालयामुळे बावधन परिसरातील नागरिकांची सोय झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे चीफ पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते बावधन टपाल कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये, टपाल सेवा विभागाच्या संचालक सिमरन कौर, पुणे शहर पश्चिम विभागाच्या प्रवर अधीक्षक रिपन डुलेट यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘डाक सेवा जन सेवा’ या ब्रीदवाक्यानुसार नागरिकांच्या आवश्यकतेप्रमाणे विविध सेवा या बावधन टपाल कार्यालामधून दिल्या जाणार आहेत. या कार्यालयाद्वारे बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, मराठा मंदिर परिसर, चांदणी चौक परिसर, एनडीए रस्ता, बावधन पोलीस ठाणे, न्याती, ब्रह्मा व्हॅंटेज, रामनगर, पाटीलनगर, देशमुख नगर, विज्ञान नगर, आमची कॉलनी, भुंडे वस्ती, बावधन गाव, पुराणिक अर्बिटंट, स्टारगेज, चेलराम हॉस्पिटल, शिंदेनगर भागातील नागरिकांना टपाल सेवा मिळणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of a new post office in pune city pune print news vvk 10 amy