पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित नव्याने सात पोलीस ठाण्यांच्या उभारणीला राज्य शासनाने गुरुवारी मंजुरी दिली आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (११) या  पोलीस ठाण्यांचे उदघाटन होणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

दहा वर्षांनंतर पोलीस आयुक्तालयात आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी अशी सात पोलीस ठाणे सुरू होणार आहेत.  त्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे मोठ्या पोलीस ठाण्यांवरील कामाचा बोजा हलका होण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात काम करण्यासाठी शासनाने ८१६ पदांची मान्यता दिली आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या इमारत उभारणीसाठी ६० कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या नव्या इमारत उभारणीसाठी २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

हेही वाचा >>>लाडकी बहीण योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित; मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्र्यांना कायदेशीर नोटीस

– नवीन सात पोलीस ठाण्यांचे उदघाटन

– दोन हजार ८८६ सीसीटीव्हींसाठी ४३३ कोटींच्या निधीला मंजुरी

– नवीन पोलीस आयुक्तालय इमारत उभारणीसाठी १९३ कोटी

– बंडगार्डन पोलीस ठाण्याची इमारत उभारणीसाठी २९ कोटी

नवीन पोलीस ठाणी

– खराडी पोलीस ठाणे

– फुरसुंगी ठाणे-  

– नांदेड सिटी ठाणे  

– वाघोली ठाणे

– बाणेर ठाणे-  

– आंबेगाव ठाणे-

– काळेपडळ ठाणे

नवीन सात पोलीस ठाण्यांना राज्य शासनाने मंजुरी दिली असून शुक्रवारी (११ ऑक्टोबर) या ठाण्यांचे उदघाटन केले जाणार आहे. त्याठिकाणी काम करण्यासाठी ८१६ पदांना मान्यता मिळाली आहे. पदभरती होईपर्यंत आम्ही संबंधित पोलीस ठाण्यांकडील मनुष्यबळ पुरवणार आहे. दहा वर्षांनी नव्याने पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे परिसरातील कायदा सुव्यवस्था आणखी बळकट होणार आहे.अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर