पुणे : अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे नदीपात्रात बुडालेल्या दोघांची अग्निशमन दलाने सुटका केली. भिडे पूल आणि कर्वेनगर परिसरात या घटना घडल्या. भिडे पूल परिसरात एक जण नदीपात्रातून वाहून गेल्याची माहिती अग्निशमन दलाला शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कसबा पेठेतील अग्निशमन केंद्राचे प्रमुख कमलेश चौधरी आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी त्वरीत शोधमोहिम राबविण्यास सुरुवात केली. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने पाण्यात पडलेला एक जण वाहून गेल्याचे समजले. जवानांनी महापालिका भवन परिसरातील सिद्धेश्वर घाट परिसरात शोधमोहीम राबविली. पाण्याचा प्रवाहाबरोबर वाहून आलेल्या एकाला जवानांनी बाहेर काढले. जवानांच्या तत्परतेमुळे तो बचावला. बचावलेल्या व्यक्तीचे नाव अजयकुमार गौतम (वय ४५) असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
दुसऱ्या एका घटनेत सकाळी सातच्या सुमारास कर्वेनगर भागात नदीपात्रात एकजण अडकल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच वारजे आणि सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्रातील अधिकारी प्रभाकर उमराटकर आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
हे ही वाचा…गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करण्यावरून तरुणावर कोयत्याने वार; कुठे घडली घटना?
सम अडकला असल्याची माहिती मिळताच वारजे व सिहंगड अग्निशमन वाहन बोटीसह रवाना होत घटनास्थळी पोहोचले. तिथे एक इसम नदीपाञात मधोमध अडकल्याचे निदर्शनास आले असता जवानांनी रश्शी, लाईफ रिंग, लाईफ जॅकेट याचा वापर करीत पाण्यात उतरुन अडकलेल्या इसमास धीर देत त्याला सुखरुप पाण्याबाहेर घेत कामगिरी पुर्ण केली. नदीपात्रात होडीने जवान गेले. पात्रात अडकलेल्या एकाला धीर दिली. जवानांनी पाण्याच्याा प्रवाहात अडकलेल्या एकाला बाहेर काढले.
© The Indian Express (P) Ltd