, तर एक दुचाकी चालक जखमी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे शहर आणि परिसरात काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस मध्यरात्री पर्यन्त सुरू होता.या मुसळधार पावसामुळे पर्वती येथील रमणा गणपतीजवळ भिंतीचा काही भाग कोसळला.तर शहरातील अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटनांमुळे वाहनांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल असून एका दुचाकीवर झाड पडल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्याच दरम्यान तब्बल १२ नागरिक पावसात अडकून पडले होते.त्या सर्वांची सुटका अग्निशामक विभागाच्या अधिकारी,कर्मचार्‍यांनी केली.

पुणे शहरातील येवलेवाडी स्मशानभूमी परिसरात,सुखसागरनगर,अंबामाता मंदिर,कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड,रास्ता पेठ,दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर,डॉल्फिन चौक,बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर,हडपसर, गाडीतळ,शिवाजीनगर पोलिस मुख्यालय,मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम, कसबा पेठ,फिश मार्केट जवळ,कुंभारवाडयासमोर, नारायण पेठ, मोदी गणपती,औंध,डिएव्ही स्कुल गल्ली, कसबा पेठ,पवळे चौक,कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मित्रमंडळ चौक,गंज पेठ,भवानी पेठ या भागात राहणार्‍या नागरिकांचे जोरदार पावसामुळे प्रचंड हाल झाले.तेथील अनेक सोसायटी,बैठी घरामध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या.

पाहा व्हिडीओ –

तर पर्वती रमणा गणपती जवळील सीमा भिंतीचा भाग कोसळल्याची घटना घडली.तसेच हडपसर, आकाशवाणी,चंदननगर,बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण,लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते.या घटनेतील जखमी दुचाकी चालकास तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर मंगळवार पेठ स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब 5 जण पाण्यात अडकले होते. तर कोंढवा खुर्द येथील भाजी मंडई लगत असलेल्या एका ठिकाणी 7 नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना यश आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incidents of tree fall in many places of pune due to heavy rains zws 70 svk88