अकरा गावांच्या समावेशानंतरही चार लाख नागरिकांना विकासाची प्रतीक्षा

गावांच्या समावेशाची करुण काहणी

अविनाश कवठेकर

पुणे : तीन वर्षांपूर्वी शहराचा भाग झालेल्या अकरा गावातील नागरिकांना अद्यापही विकासाची प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे. शहरात आल्याने गावांचा कायापालट होईल, ही अपेक्षा फोल ठरली असून अद्यापही या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. मिळकतकर प्रामाणिकपणे भरल्यानंतरही विकासकामांपासून गावे वंचित राहिल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत नव्याने समावेश करण्यात आलेल्या २३ गावांमध्ये विकास होणार का, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ऑक्टोबर २०२७ मध्ये महापालिका हद्दीमध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर तीन वर्षांनंतरही या गावांचे खेडेपण कायम राहिले आहे. कागदोपत्री गावे स्मार्ट सिटी असलेल्या शहराचा भाग आहेत. पाणीपुरवठय़ाचे जाळे, सांडपाणी वाहिन्या आणि प्रकल्प, प्रशस्त रस्ते, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, घन कचरा व्यवस्थापना आदी बाबबीत गावकऱ्यांना अद्यापही संघर्ष करावा लागत आहे. साडेसतरा नळी, फु रसुंगी, उरूळी देवाची आणि के शवनगर या गावांमध्ये अद्यापही पाणीटंचाई आहे. यातील फु रसुंगी आणि उरूळी देवाची येथे दर दिवसाआड पाणी येते, अशी नागरिकांची तक्रार आहे. विस्कळीत पाणीपुरवठय़ामुळे टँकरद्वारे महापालिके ला पाणीपुरवठा करावा लागत आहे. महापालिके ने येथे साठवणूक टाक्या उभारल्या आहेत, मात्र त्याचा वापरच होत नसल्याचे चित्र येथे दिसून येते. लोहगांव, साडेसतरा नळी आणि उंड्री या गावांमध्ये विकासकामे झालेली नसून प्रशस्त रस्ते, आरोग्य के ंद्रही येथे पुरेशा प्रमाणात नाहीत.

सर्वाधिक निवासी गृह प्रकल्प उभारल्या जाणाऱ्या आंबेगाव परिसरात कचरा आणि सांडपाणी वाहिन्यांची मोठी समस्या आहे. मोकळ्या जागांमुळे या भागात मोठय़ा प्रमाणावर गृह प्रकल्प उभारले जात आहेत.

मात्र रस्त्यांच्या अभावामुळे वाहतूक कोंडीही आंबेगावमध्ये पहायला मिळते. धायरी, उत्तमनगर भागात पर्यायी रस्ते, सेवा रस्तेही नाहीत. त्यामुळे गावांचा बकालपणा कायम राहिला आहे.

फुरसुंगी परिसरात पाणीपुरवठय़ाचा मोठा प्रश्न आहे. कधी दिवसाआड पाणीपरवठा होतो. सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा के ला जात आहे. रस्तेही विकसीत झालेले नाहीत.

– महेश जाधव, फु रसुंगी

आंबेगाव बुद्रुक आणि धायरी परिसरात बांधकामे मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. मात्र पायाभूत सुविधांचा अभाव येथे आहे. वाहतूक कोंडी सातत्याने होत असून पर्यायी रस्ते नाहीत.

– अ‍ॅड. विजय चव्हाण, आंबेगाव बुद्रुक

तक्रारी कोणत्या?

  •   विस्कळीत पाणीपुरवठा
  •   सांडपाणी वाहिन्यांचा अभाव
  •   रस्ते विकसन रखडले
  •  अनधिकृत बांधकामे
  •   आरोग्य सुविधांची कमतरता
  •   प्राथमिक शिक्षणाची वानवा

सर्वागीण विकासाचा दावा

अकरा गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतर सर्वागीण विकासाचा दावा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर निधीचे कारण पुढे करण्यात आले. गावांच्या समावेशानंतर महापालिके च्या अंदाजपत्रकामध्ये सातत्याने तरतूद करण्यात आली. मात्र त्यातील दहा टक्के  निधीही गावात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खर्ची पडलेला नाही. सन २०१७-१८ मध्ये १०० कोटींची तरतूद करण्यात आली. त्यानंतर २०१८-१९ मध्ये ३० कोटी तर सन २०१९-२० वर्षांसाठी ६५ कोटी रुपये तरतूद होती. चालू वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आलेली नाही. यापूर्वी झालेली आर्थिक तरतूद शहरातील विविध कामांसाठी वापरण्यात आलेली आहे. त्यामुळे गावातील विकासाचा वेग संथ राहिला आहे.

महापालिका हद्दीत तीन वर्षांपूर्वी समावेश झालेल्या गावांमध्ये सांडपाणी वाहिन्यांचे जाळे  निर्माण झालेले नाही. त्यामुळे सांडपाणी ओढे, कालवा, नाल्यात सोडले जात आहे. साडेसतरा नळी परिसरात कालव्यात सोडण्यात येत असलेले सांडपाणी.