पुणे : करोना साथरोगाच्या काळात घराघरात पोहोचलेल्या ‘डोलो ६५०’ या गोळीची उत्पादक कंपनी असलेली मायक्रो लॅब्ज आता प्राप्तिकर खात्याच्या निशाण्यावर आली आहे. मायक्रो लॅब्जकडून कर बुडवण्यात येत असल्याच्या संशयामुळे कंपनीच्या आर्थिक नोंदींवर नजर ठेवून असल्याचे समोर आले आहे.

ताप आणि विषाणूजन्य आजाराची लक्षणे असल्यास पॅरॅसिटॅमॉल हे औषध सर्रास घेतले जाते. अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायही हे औषध घेतले जाते. हे औषध पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा डॉक्टरांकडून देण्यात येतो. त्यामुळेच ताप आल्यास पॅरासिटॅमॉल घेण्यास हरकत नाही असेही डॉक्टर सांगतात. क्रोसिन आणि डोलो ६५० या दोन गोळय़ा पॅरासिटॅमॉल म्हणून सर्रास विकल्या जातात.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम

डोलो ६५० या औषधाची सहज उपलब्धता आणि करोना काळात रुग्णांना येणारा तीव्र ताप या कारणांमुळे डॉक्टरांकडून डोलो ६५० लिहून दिली जाण्याचे प्रमाण लक्षणीय होते. एवढेच नव्हे तर करोना प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमादरम्यान देखील लसीकरणानंतर ताप आल्यास घेण्याचे सुरक्षित औषध म्हणून डोलो ६५० देण्यात येत होती. त्यामुळे तिच्या विक्रीत विक्रमी वाढ झाल्याचे दिसून आले.

झाले काय?

गेल्या काही वर्षांत विशेषत: करोना साथीने अक्राळविक्राळ रूप धारण केल्यानंतर डोलो ६५० ही गोळी घराघरात पोहोचली. जुलै २०२० ते जून २०२१ या काळात डोलो ६५० च्या विक्रीत सुमारे ७४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, औषध उत्पादक कंपनी असलेल्या बेंगळुरूस्थित मायक्रो लॅब्स लिमिडेटने कर चुकवल्याचा संशय असल्याने सध्या प्राप्ती कर खात्याकडून त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत.

थोडी माहिती..

डोलो ६५० हे औषध म्हणजे ६५० मिलिग्रॅम वजनाचे पॅरासिटॅमॉल असून ताप आणि अंगदुखीवर गुणकारी म्हणून डॉक्टरांकडून हे औषध रुग्णांना लिहून दिले जाते.

Story img Loader