प्राप्तिकराचा (आयकर) परतावा भरणाऱ्यांच्या सोईसाठी आयकर कार्यालये २६ आणि २७ जुलै (शनिवार व रविवार) रोजी कार्यालयीन वेळात सुरू राहणार आहेत. हा परतावा भरण्यासाठीची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.
आयकर खात्याच्या अतिरिक्त आयुक्त एकता विश्नोई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शनिवार व रविवारी कार्यालये खुली ठेवण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना परताव्याची पावती देण्यासाठी आवश्यक ठिकाणी वेगळ्या काऊंटरची सोयही केली जाणार आहे. २६, २७, २८, ३० आणि ३१ जुलैला ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. या सर्व दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात प्राप्तिकर परतावा स्वीकारला जाईल.   

Story img Loader