दुचाकी टॅक्सीच्या विरोधात शहरातील काही रिक्षा संघटनांनी सोमवारी (१२ डिसेंबर) पुन्हा बंद पुकारल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे: दोर तुटल्याने गिर्यारोहकाचा मृत्यू; मुळशी तालुक्यातील तैलबैला गडावर दुर्घटना

अनधिकृत दुचाकी टॅक्सी बंग करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिन्यातही बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीच्या वतीने शहरात रिक्षा बंद आंदोलन करण्यात आले होते. या दिवशी संध्याकाळी उशिरा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने रिक्षा चालकांना सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे रिक्षाचा हा बंद त्या वेळी स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली होती. आश्वासनानुसार पंधरा दिवसांच्या कालावधीत मागमी मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा रिक्षा संघटनांनी दिला होता. त्यानुसार सोमवारी पुन्हा रिक्षा बंद आंदोलन सुरू करण्यात आले.

हेही वाचा >>>पुणे: महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे रंगनाथ पठारे यांना जीवनगौरव पुरस्कार

रिक्षा चालकांच्या गेल्या वेळच्या आंदोलनात रिक्षा संघटनांमध्ये काही वाद झाले होते. त्यामुळे काही रिक्षा संघटना या आंदोलनातून बाहेर पडल्या असल्या, तरी उर्वरित रिक्षा संघटना सोमवारच्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, आमच्या मागण्यांबाबत कोणताही तोडगा काढला नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा बंद पुकारण्यात येणार असल्याचे समितीचे डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.