पुणे : पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर ते खडकी स्थानकांदरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीचे काम सुरू आहे. या कामासाठी शनिवारी ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. मुंबई-पुणे दरम्यानच्या प्रवाशांना रेल्वेऐवजी इतर एसटी आणि कॅबचा वापर करावा लागला.

रेल्वेच्या ब्लॉकमुळे शनिवारी मुंबईहून सुटणाऱ्या मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस आणि मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस या गाड्या रद्द राहिल्या. याचबरोबर अनेक गाड्या विलंबाने धावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. प्रवाशांना ऐनवेळी रेल्वेऐवजी इतर पर्यायांचा अवलंब करावा लागला. प्रवाशांना एसटी बस अथवा जादा पैसे मोजून कॅबचा वापर करावा लागला.

Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?

आणखी वाचा-भुजबळ, जरांगेंचे अजित पवारांनी टोचले कान, भडक भाषण न करण्याचे आवाहन

दरम्यान, रविवारीही (ता.२६) ब्लॉक घेण्यात येणार असल्याने पुणे- तळेगाव -लोणावळा -पुणे दरम्यान धावणाऱ्या सर्व ४६ लोकल गाड्या रद्द राहणार आहेत. तसेच, रविवारी सुटणाऱ्या पुणे – मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, पुणे – मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस, पुणे – मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, मुंबई – कोल्हापूर- मुंबई कोयना एक्सप्रेस या गाड्या रद्द राहतील.

दिवाळीच्या सुट्यानंतर परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी अद्याप रेल्वेला आहे. अशावेळी रेल्वेने अचानक ब्लॉक घेतल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेने आधीपासूनच नियोजन केले असते तर प्रवाशांना आधीच याची पूर्वसूचना मिळाली असती आणि त्यांची गैरसोय टळली असती. पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या सुमारे एक लाखापेक्षा अधिक आहे. एवढ्या प्रवाशांना यामुळे फटका बसला. -हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप