आगामी वर्षात सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यात आता सहा पेपर द्यावे लागणार असून, तंत्रज्ञानही अंतर्भूत करण्यात येणार आहे. त्याशिवाय भारतीय राज्यघटनेचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम भारत विभागीय परिषदेचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष मुर्तझा काचवाला यांनी माहिती दिली. डब्ल्यूआयआरसीचे उपाध्यक्ष यशवंत कासार, खजिनदार पीयुष चांडक, विभागीय समिती सदस्या ऋता चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष काशिनाथ पठारे, सदस्य प्रणव आपटे, अमृता कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. त्यापूर्वी डब्ल्यूआयआरसीच्या शिष्टमंडळाने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आयुक्तालयात प्रधान मुख्य आयुक्त एस. एम. टाटा, प्रवीण कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in