पुणे : पदवीधर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्यासाठी देशभरातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांनी आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांशी चर्चा करून उद्योग केंद्रीत अभ्यासक्रमांची निर्मिती करावी. या अभ्यासक्रमांसाठी श्रेयांक देता येऊ शकतात, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत.यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’अंतर्गत (एनएसक्यूएफ) यूजीसीकडून कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम राबवण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

एनएसक्यूएफमध्ये ज्ञान, कौशल्य आणि कल यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे उद्योगांकडून श्रेयांकांसहित अभ्यासक्रमाची निर्मिती झाल्यास संबंधित अभ्यासक्रम एनएसक्यूएफशी समकक्ष असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थांनी उद्योग क्षेत्राशी, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांशी संवाद साधून उद्योगकेंद्रित अभ्यासक्रमांची निर्मिती, प्रचारासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमांसाठी श्रेयांक देता येऊ शकतात. या अभ्यासक्रमांतून पदवीधर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्यात मदत होईल, असेही प्रा. जैन यांनी स्पष्ट केले.