पुणे : जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. एका नव्या संशोधनानुसार १९९० ते २०२१ या कालावधीत जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान ६.२ वर्षांनी वाढले. याचवेळी भारतीयांचे सरासरी आयुर्मान ८ वर्षांनी वाढल्याचेही समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक आयुर्मानाबाबत अमेरिकेतील इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (आयएचएमई) या संस्थेतीत संशोधकांनी संशोधन केले आहे. हे संशोधन लॅन्सेट या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार अतिसार, श्वसनमार्ग संसर्ग, हृदयविकार यांच्यामुळे होणारे मृत्यू कमी झाल्याने आयुर्मान वाढण्यास मदत झाली आहे. मागील तीन दशकांत भारतीयांचे सरासरी आयुर्मान ८ वर्षांनी वाढले आहे. दक्षिण आशिया विभागात भूतानमध्ये आयुर्मानात सरासरी सर्वाधिक १३.६ टक्के वाढ झाली आहे. त्याखालोखाल बांगलादेश १३.३ वर्षे, नेपाळ १०.४ वर्षे आणि पाकिस्तान २.५ वर्षे अशी वाढ आहे.

हेही वाचा >>>देशात यंदा मोहरीचे उच्चांकी उत्पादन? १२०.९० लाख टन उत्पादनाचा अंदाज

आग्नेय आशिया, पूर्व आशिया आणि ओशनिया या विभागांमध्ये सरासरी आयुर्मानात सर्वाधिक ८.३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गंभीर श्वसनविकार, हृदयविकार, श्वसनमार्ग संसर्ग आणि कर्करोगामुळे होणारे मृत्यू या विभागांमध्ये कमी झाले आहेत. त्यामुळे सरासरी आयुर्मान वाढले आहे. याबाबत संशोधक डॉ. लिएन आँग म्हणाले की, आमच्या संशोधनातून जागतिक पातळीवरील आरोग्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक देशांनी अतिसार आणि हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी करण्यात उल्लेखनीय यम्श मिळविले आहे. याचवेळी करोनामुळे मृत्यू वाढल्यामुळे सरासरी आयुर्मानातील वाढ कमी झाली आहे.

हेही वाचा >>>Rahul Gandhi Case : “पोलीस तपासांत एवढा विलंब का?”, सात्यकी सावरकर यांचा थेट सवाल

करोना संकटामुळे १.६ वर्षांची घट

’जागतिक पातळीवर करोना संकटामुळे सरासरी आयुर्मानातील वाढ काही प्रमाणात रोखली गेली आहे. करोना संकटामुळे सरासरी आयुर्मानात १.६ वर्षांची घट झाली आहे.

’जागतिक पातळीवर मृत्युदरात १९९० ते २०१९ या कालावधीत ०.९ ते २.४ टक्के घट झाली होती. त्यानंतर करोना संकटाच्या काळात मृत्युदरात वाढ झाली.

’सर्वाधिक मृत्यू होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या रोगांमध्ये करोना दुसऱ्या स्थानी पोहोचला. यामुळे सरासरी आयुर्मानात त्यावेळी घट झाली.

सरासरी आयुर्मानातील वाढ (१९९०-२०२१)

भूतान – १३.६ वर्षे

बांगलादेश – १३.३ वर्षे

नेपाळ – १०.४ वर्षे

भारत – ८ वर्षे

पाकिस्तान – २.५ वर्षे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in average life expectancy of indians amy