पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यात बारावीचा निकाल ८७.९८ टक्के, तर दहावीचा निकाल ९३.६० टक्के लागला. गेल्यावर्षीच्या तुलनेत दोन्ही परीक्षांच्या निकालात किंचित वाढ झाली असून, राज्याचा बारावीचा निकाल ८९.७७ टक्के, तर दहावीचा ९६.५३ टक्के लागला.

सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. गेल्यावर्षी दहावीचा निकाल ९३.१२ टक्के, तर बारावीचा निकाल ८७.३३ टक्के लागला होता. त्यामुळे दहावीच्या निकालात ०.४८ टक्के, तर बारावीच्या निकालात ०.६५ टक्क्यांनी वाढ झाली. बारावीसाठी राज्यातून ३२ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ३२ हजार ३४६ विद्यार्थ्यांपैकी २९ हजार ३६ विद्यार्थी ( ८९.७७ टक्के ) उत्तीर्ण झाले. त्यात ८७.९३ टक्के मुले, तर ९१.८८ टक्के मुली आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील १ लाख ७ हजार ८३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १ लाख ७ हजार ६५५ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३ हजार ९१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune gbs loksatta news
पुण्यात गेल्या वर्षभरात आढळले ‘जीबीएस’चे १८५ रुग्ण; आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून माहिती समोर
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
GBS patients pune, GBS , Health Department ,
पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच; आरोग्य विभागाचा सर्वेक्षणावर भर
causes of GBS, GBS, Central high level team ,
‘जीबीएस’च्या नेमक्या कारणांचा शोध! केंद्रीय उच्चस्तरीय पथकाकडून पुण्यात तपासणी सुरु
ugc on Proposed provision
यूजीसीच्या अधिसूचनांचा पुनर्विचार हवाच!
What is the decision of the State Board of Secondary and Higher Secondary Education regarding the directors and supervisors of teachers during examinations Nagpur news
दहावी, बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर नवीन वाद?….हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर…

हेही वाचा – …अन पार्थ पवारांचा पराभव आम्ही विसरू शकत नाहीत – संजोग वाघेरे

यंदा बारावीच्या परीक्षेसाठी देशभरातून १६ लाख ३३ हजार ७३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १६ लाख २१ हजार २२४ विद्यार्थ्यांपैकी १४ लाख २६ हजार ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालात उत्तीर्णांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.५२, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८१.१२ टक्के आहे. बारावीच्या २४ हजार ६८ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक, तर १ लाख १६ हजार १४५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले. पुणे विभागातून नोंदणी केलेल्या ३४ हजार ७१५ विद्यार्थ्यांपैकी ३४ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ३० हजार ९६९ विद्यार्थी (८९.७८ टक्के) उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. ८७.८७ टक्के मुले आणि ९१.९८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. बारावीच्या परीक्षेसाठी परदेशातील २० हजार ४११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २० हजार ३५५ विद्यार्थ्यांपैकी १९ हजार ५०८ विद्यार्थी (९५.८४ टक्के) उत्तीर्ण झाले. बारावीचे एकूण १ लाख २२ हजार १७० विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा द्यावी लागणार आहे.

देशभरातून दहावीच्या परीक्षेसाठी २२ लाख ५१ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २२ लाख ३८ हजार ८२७ विद्यार्थ्यांपैकी २० लाख ९५ हजार ४६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. ९२.७१ टक्के मुले, तर ९४.७५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. दहावीच्या परीक्षेत २ लाख १२ हजार ३८४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक, तर ४७ हजार ९८३ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. दहावीच्या १ लाख ३२ हजार ९३७ विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा द्यावी लागणार आहे. पुणे विभागातून १ लाख १० हजार ६८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १ लाख १० हजार ४९८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ६ हजार ५८५ विद्यार्थी (९६.४६ टक्के) उत्तीर्ण झाले. पुणे विभागात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक आहे. ९५.९३ टक्के मुले, तर ९७.१७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. दहावीच्या परीक्षेसाठी परदेशातून २७ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २७ हजार ६५२ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार २६७ विद्यार्थी (९८.६१ टक्के) उत्तीर्ण झाले. राज्याचा निकाल ९६.५३ टक्के लागला असून, त्यात ९६.०२ टक्के मुले, तर ९७.२१ टक्के मुली आहेत.

हेही वाचा – मावळ : ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाला अटक

त्रिवेंद्रम विभागाची आघाडी…

बारावीच्या विभागनिहाय निकालात त्रिवेंद्रम विभागाने ९९.९१ टक्क्यांसह देशात आघाडी मिळवली. त्या खालोखाल विजयवाडा विभागाचा ९९.०४ टक्के, तर चेन्नई विभागाचा ९८.४७ टक्के निकाल लागला. प्रयागराज विभागाचा निकाल सर्वांत कमी ७८.२५ टक्के लागला. दहावीच्या विभागनिहाय निकालात त्रिवेंद्रम विभागाने ९९.७५ टक्क्यांसह देशात बाजी मारली. त्या खालोखाल विजयवाडा विभागात ९९.६० टक्के, चेन्नई विभागात ९९.३० टक्के निकाल लागला. गुवाहाटी विभागाचा निकाल सर्वांत कमी ७७.९४ टक्के लागला.

Story img Loader