पुणे : ‘पुराेगामी पुण्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढते आहे. महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे प्राधान्याने नोंदवून त्यांना न्याय द्यावा, तसेच आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. पीडित महिलांना आधार देण्यासाठी पोलिसांकडून त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे शहरातील गंभीर गुन्ह्यांचा वार्षिक आढावा गुरुवारी जाहीर करण्यात आला. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, शैलेश बलकवडे, प्रवीणकुमार पाटील, अरविंद चावरिया या वेळी उपस्थित होते. गेल्या वर्षी घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची माहिती, तसेच पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हेही वाचा – Sarang Punekar : सावित्रीबाई फुले विद्यापीठातील उच्चशिक्षित तृतीयपंथीय विद्यार्थी सारंग पुणेकरची आत्महत्या, जयपूरमध्ये संपवलं आयुष्य

शहरात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मुळात महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे प्राधान्याने नोंदवून घेण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत. शाळकरी मुलांचे योग्य आणि अयोग्य स्पर्शाबाबत समुपदेशन करण्यात येत आहे. त्यामुळे बालकांवरील अत्याचारांचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. अत्याचार प्रकरणातील १२०० फिर्यादी पीडित महिलांना पोलिसांना आधार देण्यासाठी पोलीस त्यांच्या संपर्कात आहेत. पीडित महिलांना आरोपींकडून त्रास देण्यात येत नाही ना, त्यांच्यावर कोणताही दबाब टाकण्यात येत नाही ना, याचीही माहिती घेण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

खून, खुनाचा प्रयत्नात घट

२०२४ मध्ये शहरात ९३ खून झाले. त्यापैकी १४ खून गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झाले होते. २०२३ मध्ये शहरात १०१ खून झाले होते. २०२३ मध्ये खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी २४४ गु्न्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी २४४ गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. गंभीर दुखापत केल्याप्रकरणी १५३५ गुन्हे दाखल झाले होते. २०२३ मध्ये १३९० गुन्हे दाखल झाले होते. दहशत निर्माण करुन दुखापत करणाऱ्या सराइतांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दुखापतीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.

फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे

फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २०२४ मध्ये फसवणुकीचे २०२१ गुन्हे दाखल झाले. २०२३ मध्ये ११०८ गुन्हे दाखल झाले होते. फसवणूक, सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सामान्यांना न्याय देण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्या यावे. जमीन बळकावणे, फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

हेही वाचा – “शरद पवार, अजित पवार एकत्र आले तर…”, दत्ता भरणेंच्या वक्तव्याची चर्चा

पुण्यातील गुन्हेगारी दृष्टीक्षेपात

  • २०२४ मध्ये गंभीर स्वरुपाचे १२ हजार ९५४ गु्न्हे दाखल (भाग एक ते पाच गुन्हे)
  • १०० गुन्हेगारांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई (एमपीडीए)
  • ४८ गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध ‘मोक्का’कारवाई
  • घरफोडीच्या गुन्ह्यात घट, ५२७ घरफोडीचे गुन्हे दाखल
  • शिक्षेचे प्रमाण वाढीस
  • महिलांच्या सुरक्षेस प्राधान्य; १०९१ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
  • महिला दक्षता समितीच्या बैठका
  • अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी समुपदेशन, पालकांशी संंवाद

गुन्हे सांख्यिकी

गंभीर गुन्हे – दाखल गुन्हे (२०२४) – दाखल गुन्हे (२०२३)

खून – ९३ – १०१

खुनाचा प्रयत्न – १८६ – २५५

फसवणूक – २०२१ – ११०८

दुखापत – १५३५ – १३९०

घरफोडी – ५२७ – ६०४

वाहन चोरी – १९८२ – १९८९

बलात्कार – ५०५ – ४१०

विनयभंग – ८६४ – ७७५

एकुण गंभीर गुन्हे – १२९५४ – ११९७४

दागिने हिसकाविणाऱ्यांवर चोरट्यांवर मोक्का कारवाई

गेल्या काही दिवसांत शहरात पादचारी महिलाकंडील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांना जरब बसविण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

पुणे पोलिसांचे महत्वपूर्ण तपास

  • सोमवार पेठेतून मेफेड्रोन जप्त, कुरकुंभमधील कंपनीवर छापा, ३६०० कोटींचे मेफेड्रोन जप्त
  • माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरण
  • शरद मोहोळ खून प्रकरण
  • सतीश वाघ खून प्रकरण
  • कल्याणीनगर अपघात प्रकरण
  • बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण