पुणे : देशात घरांच्या किंमतीत यंदा वाढ नोंदवण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत प्रमुख आठ महानगरांमध्ये घरांच्या किमतीत सरासरी ७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सर्वाधिक १० टक्के वाढ बंगळुरू शहरात झाली असून, त्याखालोखाल पुण्यात ८ टक्के वाढ झाली आहे.
देशातील प्रमुख महानगरांमधील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल ‘प्रॉपटायगरडॉटकॉम’ने जाहीर केला आहे. यानुसार, जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत नवीन घरांच्या सरासरी किमतीत वाढ झाली आहे. मागील वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत बंगळुरूमध्ये ही वाढ १० टक्के आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये बंगळुरूत घरांच्या किमती सर्वांत जास्त वाढल्या आहेत. त्याखालोखाल पुण्यात ही वाढ ८ टक्के आणि अहमदाबादमध्ये ७ टक्के आहे.

हेही वाचा >>>पुणे : स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये चालायचा वेश्या व्यवसाय; दलालासह चार तरुणी ताब्यात

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
loksatta editorial on inflation
किरकोळ महागाई दराने गाठला १४ महिन्यांचा उच्चांक; ऑक्टोबर महिन्यात ६.२१ टक्क्यांची नोंद
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय

घरांच्या किमतीत वाढ होण्याचे प्रमुख कारण महागाई हे आहे. मागील काही काळापासून देशात घरांच्या किमती वाढत आहेत. यात कच्चा माल आणि कामगारांचा वाढलेला खर्च प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे. याचबरोबर करोना संकट ओसरल्यानंतर घरांची मागणी वाढली आहे. तसेच, सरकारने मार्चपासून घरांवर दिले जाणारे अंशदानही बंद केले आहे. यामुळे घरांच्या किमती महागल्या आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सध्या रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीबाबत जैसे थे धोरण स्वीकारले आहे. महागाईचा दर वाढल्यास रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पर्यायाने गृहकर्जे महाग होऊन ग्राहकांवरील बोजाही वाढणार आहे, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

शहर घरांचा प्रतिचौरस फूट दर किमतीत वाढ (टक्क्यांमध्ये)
मुंबई १०२००-१०४०० ५
पुणे ५८००-६००० ८
बंगळुरू ६२००-६४०० १०
अहमदाबाद ३७००-३९०० ७
दिल्ली ४७००-४९०० ६
हैदराबाद ६२००-६४०० ४
कोलकाता ४६००-४८०० ६
चेन्नई ५७००-५९०० १

भारतातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती मागील वर्षभरापासून ६ ते ७ टक्क्याने वाढत आहेत. कच्च्या मालाचा खर्च महागल्यामुळे आणि तयार घरांना ग्राहकांचे असलेले प्राधान्य यामुळे घरांच्या किमती वाढत आहेत.- अंकिता सूद, संशोधन प्रमुख, प्रॉपटायगरडॉटकॉम