लोणावळा : लोणावळ्यात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसात दागिने चोरुन नेण्याच्या तीन घटना घडल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लोणावळ्यातील रायवूड पार्क, भांगरवाडी, वळवण भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरुन नेले. वळवण-बापदेव रस्त्यावर महिलेच्य गळ्यातील दागिने चोरणारा चोरटा सीसीटीव्ही चित्रीकरणात कैद झाला आहे. वळवण परिसरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दागिने चोरुन चोरटे दुचाकीवरुन पसार झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन दिवसात दागिने चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. दागिने चोरीच्या घटनांमुळे सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. दोन महिन्यांपूर्वी लोणावळ्यात दुकानात शिरुन चोरट्यांनी महिलेचे दागिने चोरून नेले होते.

हेही वाचा – पुणे : सावत्र वडिलांच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या

दुचाकीस्वार चेहरा माकडटोपी घालून झाकतात. पोलिसांनी दररोज सकाळी आणि सायंकळी गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्या महिलांना शक्यतो दागिने वापरु नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – शहरबात… असा ‘अंमल’ बरा नव्हे!

चोरट्यांनी पादचारी महिलांना लक्ष्य केले आहे. दागिने चोरीच्या घटनांमुळे महिला घाबरल्या आहेत. पोलिसांनी दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांना पकडावे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास रिपब्लीकन पक्षाच्या वतीने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता राेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव, माजी नगराध्यक्ष सूर्यकांता वाघमारे यांनी दिला आहे.