पुणे : गणेशोत्सव हा पुणे शहरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर शहराच्या मध्यवर्ती भागात येतात. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे आणि विसर्जनाच्या दिवशी मेट्रो रात्री २ पर्यंत चालू असणार आहे, अशी माहिती महामेट्रोने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी शहरासह विविध भागांतून नागरिक येतात. त्या दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून गणेशोत्सव काळातील शेवटचे पाच दिवस मेट्रो रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्यात यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केली होती. यानुसार महामेट्रोने हा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्सवाच्या काळात मध्यवर्ती भागात येणाऱ्या नागरिकांची सोय होणार आहे.

आणखी वाचा-लोकसभा लढविणार का? आमदार रोहित पवार म्हणाले.. “मी यावेळी…”

असे असेल मेट्रोचे वेळापत्रक

कालावधी- विस्तारित वेळ
२२ ते २७ सप्टेंबर – सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत
२८ सप्टेंबर – सकाळी ६ ते रात्री २ पर्यंत

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in metro timings during ganeshotsav know the new schedule pune print news stj 05 mrj