पुणे : मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवस वाढ करण्याचे आदेश पौड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बरडे यांनी शनिवारी दिले.

मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पूजा खेडकर यांची आई मनोरमा, वडील दिलीप, अंगरक्षकासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या मनोरमा यांना महाड परिसरातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली. याबाबत शेतकरी पांडुरंग कोंडिबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव पुनर्वसन, ता. दौंड) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पौड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आता पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला.

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Rajasthan Candidate Who Slapped sdm
‘थप्पड’ प्रकरणाने राजस्थानात तणाव; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप; अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना अटक, समर्थकांकडून जाळपोळ
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप

हेही वाचा – अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या ‘त्या’ सूचनेचे केले कौतुक

ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि पथकाने बाणेर येथील नॅशनल हाऊसिंग सोसायटीत असलेल्या बंगल्याची झडती घेतली. यावेळी पोलिसांनी मनोरमा यांना बंगल्यात आणले होते. त्यांच्या समक्ष बंगल्यातून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त करण्यात आली होती. मनोरमा यांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपली. त्यांना पौड न्यायालयात पोलिसांनी हजर करण्यात आले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून, पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून शेतकऱ्याला धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल आमि काडतुसे जप्त करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्यांना शस्त्रपरवाना रद्द का करू नये, अशी नोटीसही बजाविली असून, मनोरमा यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकील ननावरे यांनी युक्तिवादात केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बरडे यांनी मनोरमा यांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत (२२ जुलै) वाढ करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – Puja khedkar : पुणे पोलिसांच्या दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर

मनोरमा खेडकर यांचे आरोप

पोलीस कोठडीत चांगले जेवण मिळत नसल्याची तक्रार मनोरमा खेडकर यांनी न्यायालायत केली. पाेलिसांनी त्यांचे आरोप फेटाळून लावले. दरम्यान, मुळशीतील शेतकऱ्याला धमकाविण्यासाठी खेडकर मोटारीतून गेल्या होत्या. पोलिसांनी मोटार तपासासाठी ताब्यात घेतली आहे.