पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागणी वाढल्याने हिरवी मिरची, ढोबळी मिरची, पावटा, तोतापुरी कैरीच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१ जानेवारी) राज्य; तसेच परराज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली.

आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधून मिळून १० ते १२ टेम्पो कोबी, राजस्थानातून ९ ते १० टेम्पो गाजर, पंजाब आणि मध्य प्रदेशातून मिळून २५ ते २६ टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकातून १५० क्रेट्स (प्लास्टिक जाळी) तोतापुरी कैरी तसेच ३ ते ४ टेम्पो घेवडा, बंगळुरुतून २ टेम्पो आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ७ ते ८ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ५० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
Cucumber, flower, brinjal, carrot,
पुणे : काकडी, फ्लॉवर, वांगी, गाजर स्वस्त
Executive Trustee of Bharatiya Unit Trust and apex body of mutual funds A P Kurian
बाजारातली माणसं : फंड उद्योगाचा पायाचा दगड, ए. पी. कुरियन

पुणे विभागातून सातारी आले ११०० ते १२०० गोणी, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कांदा १०० ट्रक अशी आवक झाली.

मेथी, कांदापात, पुदिना, चवळईच्या दरात घट

मार्केट यार्डातील तरकारी विभागात मेथी, कांदापात, पुदिना, चवळई या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. कोथिंबिर, शेपू, चाकवत, करडई, अंबाडी, मुळा, चुका, पालक, हरभरा गड्डीचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एक लाख २५ हजार जुडींची आवक झाली. मेथीच्या एक लाख जुडींची आवक झाली. कांदापात आणि चुक्याच्या दरात जुडीमागे २ रुपये, मेथी, पुदिना, चवळईच्या जुडीमागे एक रुपयांनी घट झाली. राजगिरा जुडीच्या दरात १ रुपयांनी वाढ झाली. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर होते.

लिंबू, अननस, खरबूज, सीताफळ, सफरचंद महाग

मार्केट यार्डातील फळबाजारात लिंबू, अननस, खरबूज, सीताफळ, सफरचंदांच्या दरात वाढ झाली. पपईच्या दरात घट झाली. मोसंबी, डाळिंब, संत्री, कलिंगड, बोरे, चिकू, पेरुचे दर स्थिर आहेत. फळबाजारात केरळहून ५ ट्रक अननस, संत्री १ ते २ टन, मोसंबी २० ते २५ टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे तीन ते साडेतीन हजार गोणी, पेरु ७०० ते ८०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी), कलिंगड ३ ते ४ टेम्पो, बोरे एक हजार ते १२०० गोणी, सीताफळ १० ते १२ टन अशी आवक झाली.

Story img Loader