पुणे : मागणी वाढल्याने भेंडी, गवार, फ्लाॅवर, वांगी, मटारच्या दरात वाढ झाली. शेवगा, घेवड्याच्या दरात घट झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (११ ऑगस्ट) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटकातून पावटा आणि घेवडा प्रत्येकी २ ते ३ टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ८ ते ९ टेम्पो गाजर, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १ टेम्पो भुईमुग शेंग, तामिळनाडूतून १ टेम्पो कैरी, मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा – पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीला सुरुवात

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, टोमॅटो १० ते ११ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार ८ ते १० टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंग ६० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा १०० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४५ ते ५० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

कांदापात, पुदिना, अंबाडी, चुका, राजगिऱ्याच्या दरात घट

पावसाने उघडीप दिल्याने पालेभाज्यांची आवक वाढली. कांदापात, पुदिना, अंबाडी, चुका, राजगिरा या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. मेथी, शेपूच्या दरात वाढ झाली आहे. कोथिंबीर, चाकवत, मुळा, चवळई, पालकचे दर स्थिर आहेत. तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर एक लाख जुडी, मेथीच्या ७० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – लोणावळ्यात जुगार अड्ड्यावर छापा; पोलिसांकडून १४ जणांवर गुन्हा

घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे –

कोथिंबीर – १००० ते १५०० रुपये, मेथी – ८०० ते १५०० रुपये, शेपू – ८०० ते १००० रुपये, कांदापात – ८०० ते १२०० रुपये, चाकवत – ४०० ते ७०० रुपये, करडई – ४०० ते ७०० रुपये, पुदिना – ५०० ते ८०० रुपये, अंबाडी – ४०० ते ७०० रुपये, मुळे – ८०० ते १५०० रुपये, राजगिरा – ४०० ते ७०० रुपये, चुका – ५०० ते ७०० रुपये, चवळई – ४०० ते ७०० रुपये, पालक – ८०० ते १५०० रुपये.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in price of okra cauliflower brinjal peas and other vegetable due to increase in demand pune print news rbk 25 ssb