मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात आवक कमी झाल्याने टोमॅटो, फ्लॅावर, शेवगा या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली. घेवडा आणि वांग्याच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (४ सप्टेंबर) राज्य; तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून २ ते ३ ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून १ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो घेवडा; तसेच २ टेम्पो कोबी, इंदूरहून ८ ते ९ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १३ ते १४ ट्रक लसूण, आग्रा, इंदूरमधून मिळून ३० ते ३५ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली. पुणे विभागातून सातारी आले ८०० ते ९०० गोणी, कोबी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ७ ते ८ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ५ ते ६ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

Farmers halted auctions in Lasalgaon demanding immediate cancellation of onion export duty
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
arrival of vegetables in huge amount for Bhogi
भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
coconut prices increased loksatta news
बदलत्या हवामानामुळे नारळ उत्पादन घटले, श्रीफळ (नारळ) महागले
Rapid hair loss and baldness are caused by increased nitrate levels in water
केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल, पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढणे कारणीभूत!
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
tomato cauliflower cabbage ginger peas prices fall down
आले, टोमॅटो, मटार, फ्लॉवर, कोबीच्या दरात घट
agriculture career opportunities loksatta
मातीतलं करिअर : शेतीतील संधी

हेही वाचा : पुणे : पीएमपी चालकाला बेदम मारहाण ; मुजोर मोटारचालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा

कोथिंबीर, पालक कांदापातीच्या दरात घट

मार्केट यार्डातील तरकारी विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली आहे. कोथिंबीर, पालक, कांदापात, चाकवतच्या दरात घट झाली आहे. राजगिरा आणि चवळईच्या दरात वाढ झाली असून चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांना मागणी आहे. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात काेथिंबिरीच्या दोन लाख जुडी; तसेच मेथीच्या ८० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीमागे पाच रुपये, कांदापात सहा रुपये, चाकवत दोन रुपये आणि पालकाच्या जुडीमागे तीन रुपयांनी घट झाली आहे.

हेही वाचा : पुणे : विवाहाच्या आमिषाने डॅाक्टर तरुणीची फसवणूक ; फसवणूक प्रकरणी डॅाक्टरच्या विरोधात गुन्हा

डाळिंब, कलिंगड, लिंबू, पपईच्या दरात वाढ

गणेशोत्सवामुळे फळांना मागणी वाढली आहे. डाळिंब, कलिंगड, लिंबू,पपई, खरबुज या फळांच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पेरुची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे.सीताफळ, अननस, संत्री, मोसंबी, चिकू या फळांचे दर स्थिर आहेत. फळबाजारात लिंबू एक ते दीड हजार गोणी, डाळिंब ४० ते ४५ टन, पपई ५ ते ६ टेम्पो, कलिंगड ५ ते ६ टेम्पो, खरबूज २० ते ३० टेम्पो, चिकू दोन हजार खोकी, सीताफळ ३० ते ३५ टन, संत्री ८ ते १० टन, मोसंबी ६० ते ७० टन, पेरू ८०० ते ९०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी) अशी आवक फळबाजारात झाली.

हेही वाचा : पुणे : बनावट पावती पुस्तके तयार करुन सोसायटीच्या नावाने वर्गणी ; तरुणाच्या विरोधात गुन्हा

आवक वाढल्याने झेंडुच्या दरात घट

गणेशोत्सवामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. झेंडुची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. अन्य फुलांचे दर स्थिर असल्याची माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली. गौरी आवाहनामुळे फुलांना चांगली मागणी होती.

Story img Loader