लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
आणखी वाचा-पिंपरी: पत्नीबद्दल अश्लील शब्द वापरले; जखमी मित्राला नाशिक फाटा पुलावरून ढकलून केली हत्या!
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१७ सप्टेंबर) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गुजरात, कर्नाटकमधून ७ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून २ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ४ टेम्पो घेवडा, इंदूरमधून ८ टेम्पो गाजर, बंगळुरूतून १ टेम्पो आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ८ टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.
आणखी वाचा-पिंपरीत ‘पंतप्रधान आवास’च्या दोन हजार सदनिका… इच्छुक अर्जांच्या छाननीसाठी अडीच कोटींची उधळण?
पुणे विभागातून सातारी आले ७०० गोणी, टोमॅटो १० हजार पेटी, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, पुरंदर, वाई, सातारा भागातून मटार ६ टेम्पो, पावटा ५ टेम्पो, भुईमूग शेंग १२५ गोणी, ढोबळी मिरची १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा ८० ट्रक अशी आवक झाली.