पुणे : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसवर गेले आहे. गुरुवारी सोलापुरात सर्वाधिक ३८.६, तर यवतमाळमध्ये ३८.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमाल तापमानात सरासरी एक ते दीड अंशाने वाढ झाली आहे.

उत्तरेकडून येणारा थंड हवेचा प्रवाह क्षीण झाल्यामुळे कमाल-किमान तापमानात वाढ झाली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अवकाळीचे ढगही विरले आहेत. राज्यभरात हवामान कोरडे आहे. आकाश ११ मार्चनंतर अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. दहा मार्चनंतर तापमानात अर्धा ते एक अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Maharashtra, cold, winter, weather forecast, 15 November
राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, मात्र…
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!

हेही वाचा >>>शिरूरमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्याची आढळरावांची अप्रत्यक्ष कबुली

गुरुवारी राज्याच्या बहुतेक भागात ३५ अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम; मराठवाड्यातील नांदेड, परभणी, उदगीर; मध्य महाराष्ट्रात जेऊर, कोल्हापूर, मालेगाव, पुणे, सातारा येथे कमाल तापमान ३५ अंशांच्या वर गेले होते.

पहाटे गारवा

राज्यात गुरुवारी सर्वांत कमी ११.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली. मुंबईसह किनारपट्टीवर अनेक ठिकाणी पहाटे गारवा जाणवत आहे. लेह, लडाखमध्ये १० व १२ मार्च रोजी पुन्हा थंड हवेचे दोन झंझावात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रावर त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. हवामान कोरडे राहून पहाटे थोडीशी थंडी जाणवू शकते, अशी माहिती निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>राज्यातील शाळांमध्ये २ ते ४ एप्रिल दरम्यान संकलित मूल्यमापन;  पाचवी, आठवीची स्वतंत्रपणे वार्षिक परीक्षा

‘डब्ल्यूएमओ’कडूनही उष्णतेच्या झळांचा अंदाज

जागतिक हवामान संघटनेने एल-निनोमुळे जगाच्या विविध भागांत उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. प्रशांत महासागरातील एल-निनोची स्थिती उन्हाळाभर कायम राहून, जूनमध्ये एल-निनो निष्क्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतात यंदाच्या उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा आणि उष्णतेच्या झळांची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एल-निनोमुळे जून २०२३पासून आजवरचे सर्व महिने सरासरीपेक्षा उष्ण ठरले आहेत, अशी माहिती जागतिक हवामान संघटनेचे सरचिटणीस सेलेस्टे साऊलो यांनी दिली आहे.