पुणे : हिमालयाच्या पश्चिम भागात १ डिसेंबरच्या आसपास पश्चिमी चक्रावात धडकणार आहे. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे थंड वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. परिणामी गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागात असलेले ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा हळूहळू थंडी वाढू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. तसेच मराठवाडा भागात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा पाच ते सहा अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या वरील भागात ही स्थिती तयार झाली होती. मात्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी घट कायम होती. त्यामुळे या भागात थंडीचा कडाका कायम होता. आता मात्र, दक्षिणेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. परिणामी राज्याच्या सर्वच भागात मंगळवारपासून थंडी वाढू लागली आहे.

हेही वाचा >>> भाजपची महत्त्वाकांक्षी योजना अडचणीत?

प्रमुख शहरांचे कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)

शहर कमाल किमान

गोंदिया २९            ११.२

वर्धा ३०.२ १२

नागपूर ३०.२ ११.३

जळगाव ३१.५ १२.३

पुणे ३२.३ १५

कोल्हापूर ३०.५ २२.८

औरंगाबाद ३१.३ १२.३

नाशिक ३१.१ १३

सांगली ३१.२ २१.८

सातारा २९.६ २०.६

सोलापूर ३३.८ १८.५

मुंबई २९.२ २०.८

रत्नागिरी ३२              २२.२

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in the intensity winter in the state rainfall in madhya maharashtra konkan pune print news ysh