पुणे : राज्यात निरभ्र आकाशाची स्थिती आणि कोरडय़ा हवामानामुळे रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारव्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. तापमानातील ही घट तीन ते चार दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र पुन्हा तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन गारवा कमी होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी रात्रीच्या गारव्यात वाढ झाली आहे. या भागात उन्हाचा चटकाही कमी आहे.

बंगालचा उपसागर आणि त्यानंतर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस झाल्याने महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातून रात्रीच्या किमान तापमानात वाढ होऊन प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकणात थंडी कमी झाली. सध्या पावसाळी स्थिती निवळली आहे. त्यामुळे राज्यातही निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली. त्यातून गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भातील रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. त्यापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही तापमानात घट होत आहे.  बंगालच्या उपसागरामध्ये दोन दिवसांत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्याचा सध्या तरी राज्यावर कोणता परिणाम होणार नसल्याचे दिसते आहे. हिमालयीन विभागात काही भागांत बर्फवृष्टीची शक्यता आहे. उत्तकरेकडील राज्यांमधील तापमानात घट होणार आहे. गुजरातमध्येही किमान तापमान २-३ अंशांनी कमी होणार आहे. याच काळात महाराष्ट्रातही तापमानातील घट कायम राहणार आहे. २२ नोव्हेंबरपासून मात्र तापमानात किंचित वाढ होईल.

Constant changes in the states climate But wait for the winter
राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
belgaon black day marathi news
सीमा भागात काळा दिन; बेळगावात फेरीला प्रतिसाद
Mumbai air quality remains in moderate category
दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच; कोणत्या भागातील हवा ‘अतिवाईट’?
new method developed to find out connection between building material and temperatures
बांधकाम साहित्य आणि तापमानांचा संबंध शोधणारी नवी पद्धत विकसित, काय आहे पद्धती वाचा…
how to make water diya at home
Diwali 2024 : तेल नव्हे, पाण्यावर जळतात हे दिवे? या दिवाळीला वापरा पाण्यावर जळणारे दिवे, जाणून घ्या हटके जुगाड
Increase in heat in next two days in Mumbai print news
मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे

रात्रीचे तापमान सरासरीखाली

मुंबई शहर वगळता राज्याच्या जवळपास सर्वच विभागांमध्ये रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली आहे. त्यामुळे रात्री गारवा आहे. मुंबईतील तापमान सरासरीच्या बरोबरीत आहे. गुरुवारी (१७ नोव्हेंबर) नगर येथे राज्यातील नीचांकी १२.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ औरंगाबाद १२.५, महाबळेश्वर १२.८, पुणे १२.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. सोलापूर, सातारा, परभणी, अमरावती, गोंदिया, वर्धा आदी भागांतही सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात मोठी घट झाल्याने गारवा जाणवतो आहे.