पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागणी वाढल्याने कांदा, बटाटा, लसूण, भेंडी, गवार, कोबी, शेवगा या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली. हिरवी मिरची, ढोबळी मिरची, घेवड्याच्या दरात घट झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटकातून २ टेम्पो पावटा, कर्नाटक आणि गुजरातमधून ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून २ ते ३ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ६ ते ७ टेम्पो गाजर, गुजरातमधून ५० टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
Solapur Onion auction resumed on Monday after a four day work stoppage by Mathadi workers
चार दिवसांच्या खंडानंतर, सोलापुरात कांदा लिलाव
potato prices , prices vegetables pune,
आवक वाढल्याने कांदा, मटार, शेवगा, बटाट्याच्या दरात घट
nashik Angry farmers protested on Manmad Yewla Road halting auction due to falling onion prices
येवला बाजार समितीत शेतकऱ्यांकडून लिलाव बंद, मनमाड रस्त्यावर ठिय्या
Pomegranate loksatta news
फळबाजारात फडकतोय डाळींबाचा “भगवा”, आवक घटल्याने डाळींबाची चढ्या दराने विक्री

हेही वाचा…भवानी पेठेत आर्थिक व्यवहारातून व्यावसायिकाची आत्महत्या, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो सात ते आठ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार ४० ते ५० गोणी, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंग ४० ते ५० गोणी, कांदा ७० ते ८० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० ते ४५ टेम्पो बटाट्याची आवक झाली.

कोथिंबिर, मेथी, शेपू, कांदापात, करडईच्या दरात वाढ

गेल्या आठवड्याच्या तुलनेत काेथिंबिर, मेथी, शेपू, कांदापात, करडई, अंबाडी, मुळा, चुका, चवळई, पालक या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.चाकवत, पुदिना, राजगिरा या पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर एक लाख जुडी, तसेच मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली. किरकोळ बाजारात कोथिंबिरेच्या एका जुडीची विक्री २० ते ३० रुपये दराने केली जात आहे. मेथीच्या एका जुडीची विक्री ४० रुपयांना केली जात आहे. बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १५०० ते २०००, मेथी – २५०० ते ३०००, शेपू – १५०० ते २०००, कांदापात- १५०० ते २०००, चाकवत – ५०० ते ८००, करडई- ५०० ते ८००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ८००, मुळे – १२०० ते २०००, राजगिरा- ५०० ते ८००, चुका – ५०० ते १०००, चवळई- ५००-८००, पालक- १२००-२०००.

हेही वाचा…सराफी पेढीवर दरोड्याच्या तयारीतील तिघांना पकडले, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा

चिकू, पेरु, पपईच्याा दरात वाढ

चिकू, पेरु, पपईच्या दरात वाढ झाली आहे. लिंबांच्या दरात घट झाली आहे. कलिंगड, खरबूज, सीताफळ, अननस, माेसंबी, संत्री, डाळिंब, बोरांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी ४५ ते ५० टन, संत्री ४० ते ५० टन, डाळिंब ६० ते ७० टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबे दोन ते तीन हजार गोणी, कलिंगड २ ते ३ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, चिकू २०० गोणी, पेरू ६०० ते ७०० प्लास्टिक जाळी (क्रेट), बाेरे ८०० गोणी, सीताफळ ३० ते ३५ टन अशी आवक झाली.

Story img Loader