लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेअंतर्गत शिल्लक सदनिकांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ हजार ८६१ नागरिकांनी संकेतस्थळावर प्राथमिक नोंदणी केली असून १ हजार ७१७ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत.

पीएमआरडीएकडून १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील (ईडब्ल्यूएस) ४७ सदनिका, कमी उत्पन्न गट (एलआयजी) प्रवर्गासाठी ६१४ सदनिका आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ३४७ सदनिका आणि एलआयजी प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ सदनिका उपलब्ध आहेत.

आणखी वाचा-माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील सदनिकांचा आकार २९.५५ चौरस मीटर असून सदनिकांची किंमत १५ लाख ७४ हजार ४२४ एवढी आहे. कमी उत्पन्न गटातील सदनिकांचे क्षेत्र ५९.२७ चौरस मीटर असून किंमत ३५ लाख ५७ हजार २०० एवढी निश्चित करण्यात आली आहे. परवडणारी घरे योजनेअंतर्गत सदनिकांचे क्षेत्र २५.५२ चौरस मीटर आणि किंमत २० लाख ९० हजार ७७१ एवढी तर, कमी उत्पन्न गटातील सदनिकांचा आकार ३४.५७ चौरस मीटर असून त्याची किंमत २८ लाख ३२ हजार २०८ एवढी आहे.

आणखी वाचा-छगन भुजबळ यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका; म्हणाले, ‘निवडणुकीत…’

प्रारंभी या योजनेसाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र नागरिकांना कागदपत्रे मिळविण्यास अडचणी येत असल्याने योजनेची मुदत ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत ४ हजार ८६१ नागरिकांनी संकेतस्थळावर प्राथमिक नोंदणी केली असून १ हजार ७१७ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. या सदनिकांसाठी शनिवारपर्यंत (३० नोव्हेंबर) https://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पीएमआरडीचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.