Ind vs Eng T-20 Match at Gahunje Pune: भारत व इंग्लंड यांच्यादरम्यान सध्या टी-२० क्रिकेट सामन्यांची मालिका चालू आहे. या मालिकेतील एक सामना पुण्याजवळीस गहुंजे क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यासाठी गहुंजे स्टेडियमवर सर्व व्यवस्था चोख ठेवण्यावर MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं लक्ष केंद्रीत केलं आहे. पण प्रत्यक्ष स्टेडियमवर क्रिकेट चाहत्यांना सुविधा उपलब्ध होणार असल्या, तरी स्टेडियमपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तिथे पोहोचल्यावरही होणारा मनस्ताप मात्र पुणेकरांसाठी अटळ असल्याचं आता दिसत आहे. स्टेडियमपर्यंत जाणाऱ्या अरुंद रस्त्यांमुळे ही अडचण उद्भवल्याचं एमसीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोल्डप्लेसाठी स्वतंत्र ट्रेन, पण पुणेकरांना बसही मिळेना!

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर नुकतीच प्रसिद्ध ‘कोल्डप्ले’ कॉन्सर्ट पार पडली. या कॉन्सर्टसाठी मुंबईहून चाहत्यांना पोहोचणं सोपं व्हावं, यासाठी गोरेगाव ते नेरुळ अशी विशेष लोकल ट्रेन उपलब्ध करून देण्यात आली होती. याचप्रकारे येत्या ३१ जानेवारी रोजी गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या भारत वि. इंग्लंड टी २० सामन्यासाठी पुण्यातून वेगळी बस सेवा उपलब्ध करून दिली जाईल का? असा प्रश्न इंडियन एक्स्प्रेसकडून उपस्थित करण्यात आला असता त्यावर एमसीएनं असमर्थता दर्शवली.

New car accident in Pune car owener got emotional viral video on social media
VIDEO: असं नशीब कोणाच्याच वाट्याला येऊ नये! पुण्यात नवीकोरी कार घेतली अन्…, ‘त्या’ माणसाबरोबर जे घडलं ते पाहून डोळ्यात येईल पाणी
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Pimpri Municipal Corporation, Cycle Track ,
पिंपरी : महापालिकेचा सायकल ट्रॅक की अडथळ्यांची शर्यत?
Chandrakant Khaire On Shiv Sena Shinde group
Chandrakant Khaire : ‘शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर’, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?
Mahakumbh News Live Updates
Mahakumbh 2025 Stampede : “परिस्थिती नियंत्रणात, पण…”, चेंगराचेंगरीनंतर प्रयागराजमध्ये नेमकी स्थिती काय? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती!
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

“आम्ही या सगळ्या गोष्टींचा सविस्तर अभ्यास केला आहे. स्टेडियमवर जाण्यासाठी पुण्यातून मोठ्या बसेसची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकादरम्यानही आम्ही याची शक्यता चाचपून पाहिली होती. पण गहुंजे स्टेडियमपर्यंत जाणारा सध्याचा रस्ता इतका अरुंद आहे की जर तिथे गेलेल्या बसनं यूटर्न जरी घेतला, तरी तिथे वाहतुकीचा मोठा खोळंबा होईल. ही खरी समस्या आहे. पण सध्या आम्ही तिथल्या रस्तारुंदीकरणावर काम करत आहोत”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.

पुणेकरांसमोर काय पर्याय?

गहुंजे स्टेडियम मुख्य पुणे शहरापासून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या सर्व चाहत्यांना खासगी वाहनांमधूनच स्टेडियमवर पोहोचणं भाग आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येनं येणाऱ्या खासगी वाहनांसाठी स्टेडियमच्या परिसरात पार्किंग व्यवस्था पुरेशी उपलब्ध नाही. त्यामुळे बरीच वाहनं रस्त्यावरच उभी करावी लागतात. शिवाय, एवढ्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीदेखील झाल्याचं दिसून येतं.

पुण्यातील एमसीएच्या मुख्यालयात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली. गहुंजेपर्यंत जाण्यासाठी विशेष मोठ्या बसेस सुरू करता येतील का? यासंदर्भात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात PMPML आणि बस पुरवठा कंपन्यांशीही चर्चा केली. पण हा पर्याय अशक्य असल्याचं ते म्हणाले. याआधी गहुंजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याबाबतदेखील त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता.

गहुंजे स्टेडियमवर मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय

दरम्यान, स्टेडियमवर पुरेसं पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी पावलं उचलण्यात आल्याचं एमसीएचे सचिव कमलेश पिसाळ यांनी नमूद केलं. गेल्या वर्षी या मैदानावर झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान पाण्याची पुरेशी सोय उपलब्ध नसल्यामुळे चाहत्यांचे हाल झाले होते. मात्र, आता ती वेळ येणार नसल्याचं पिसाळ म्हणाले. तसेच, ३१ जानेवारीला होणारा सामना संध्याकाळी होणार असल्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवणार नाही. पण असं असलं, तरीही स्टेडियममध्ये सर्वत्र मोफत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, असं पिसाळ यांनी नमूद केलं.

Story img Loader