लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी इंदापुरात सर्वाधिक ९०५१ हेक्टर फळबाग क्षेत्र आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचे उत्पादन घेण्याला पसंती दिली आहे. या पिकाचे ५०३७ हेक्टर क्षेत्रावर उत्पादन घेण्यात येत आहे.

Dairy Development Project expand from 11 to 19 districts in Vidarbha and Marathwada
दुग्धविकास प्रकल्पाची व्याप्ती वाढली; शेतकऱ्यांना १३,४०० दुधाळ जनावरांचे…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
woman self help groups marathi news
यंदाचा गणेशोत्सव बचत गटांसाठी आर्थिक फलदायी, विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीतून १५ लाखांहून अधिकची आर्थिक उलाढाल
rain water enter in hospitals in gondia
गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती,अनेक मार्ग बंद, रुग्णालयात पाणी,रुग्णांचे हाल..
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
16 districts of the state are anemic malnourished
राज्यातील १६ जिल्हे ऍनिमिया कुपोषित, मात्र ‘या’ २२ गावांची वाटचाल मुक्ततेकडे…
maharashtra recorded 29 percent more rainfall than average
Rainfall In Maharashtra : राज्यात २९ टक्के अधिक पाऊस; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांत किती पाऊस पडला
heavy rain in Dharashiv district,
धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, तेरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

विधानभवन येथे सोमवारी (८ मे) जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात एकूण फळबाग क्षेत्र २५ हजार ९६९ हेक्टर आहे. डाळिंब, सीताफळ, द्राक्ष, आंबा, पेरू, केळी, लिंबू, अंजीर, चिकू, नारळ, पपई, चिंच, संत्रा, मोसंबी आणि इतर फळांचा समावेश आहे. त्यापैकी डाळिंब पिकाचे क्षेत्र ५७३७ हेक्टर आहे. सीताफळ ४५१९ हे., द्राक्ष ४२८५ हे., आंबा ४२३४ हे., पेरू २३२१ हे., केळी १५६२ हे., लिंबू ६९२ हे., अंजीर ६१७ हे., चिकू ५९० हे., नारळ ३४९ हे., पपई ३३६ हे., चिंच १७२ हे., संत्रा १०४ हे., मोसंबी ८३ हे. आणि इतर फळांची ६८८ हेक्टरवर लागवड करण्यात येते. तसेच जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी इंदापुरात सर्वाधिक ९०५१ हेक्टर क्षेत्रावर फळांचे उत्पादन घेण्यात येते. त्यानंतर पुरंदरमध्ये ३७३९ हे., जुन्नर २९३९ हे., शिरूर २२३३ हे., दौंड २०१६ हे., बारामती १८२० हे., भोर १२१५ हे., हवेली १०७७ हे., आंबेगाव ६८२ हे., खेड ४३३, मावळ ४२० हे., वेल्हा १९० हे. आणि मुळशीत १५३ हेक्टरवर फळ उत्पादन घेण्यात येते, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.