पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार अविनाश बाळू धनवे याची पिस्तूलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वार करून तीन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. यातील एका आरोपीला पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट तीन ने ताब्यात घेऊन इंदापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. राहुल संदीप चव्हाण असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आळंदीत मैत्रिणीला भेटायला आला होता. तेव्हा त्याला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी पकडले.

हेही वाचा : पुण्यातील चाकणमध्ये हॉटेल मालकावर गोळीबार, एकाला अटक

तीन दिवसांपूर्वी इंदापूर येथील हॉटेल जगदंबमध्ये मित्रांसह गप्पा मारत बसलेल्या अविनाश धनवे याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. सहा ते सात जणांनी अचानक हल्ला केला आणि धनवेला जिवेठार मारले. कोयत्याने सपासप आठ ते दहा वार करणाऱ्या आरोपीला पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट तीनने पकडले आहे. राहुल संदीप चव्हाण हा आळंदीत त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपी राहुलची वैद्यकीय तपासणी करून त्याला इंदापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Story img Loader