पुणे : पीएमपी प्रवासी तरुणीशी अश्लील कृत्य करणाऱ्या एकाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शंकरशेठ रस्ता परिसरात ही घटना घडली.
याबाबत एका तरुणीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तुषार सुधीर खाटमोडे (वय ३४, रा. नारायण पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि तिची मैत्रीण पीएमपी बसमधून प्रवास करत होती. त्यावेळी आरोपी तुषार खाटमोडेने प्रवासात तरुणीशी अश्लील कृत्य केले. तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणींनी त्याला जाब विचारला. तरुणी, तसेच तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणींनी त्याला प्रतिकार केला. प्रतिकार केल्यानंतर तो घाबरला आणि बसमधून पसार झाला. त्यावेळी झटापटीत तरुणींनी त्याच्या गळ्यातील ओळखपत्र हिसाकावून घेतले. खाटमोडेचे नाव आणि मोबाइल क्रमांक ओळखपत्रावर होता.
हेही वाचा – सावधान! आता ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे होणार कारवाई… कोठे आणि कशी यंत्रणा ?
u
तरुणीने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा माझी तक्रार केल्यास तुला सोडणार नाही, अशी धमकी त्याने तरुणीला दिली. त्याने तरुणीला शिवीगाळ केली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे तपास करत आहेत.