पुणे : पित्याने अडीच वर्षाच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पित्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पत्नीने फिर्याद दिली आहे. आरोपी पिता शहरातील एका शाळेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे. शाळेच्या आवारातील खोलीत तो, त्याची पत्नी, अडीच वर्षांची मुलगी राहायला आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपीने मुलीशी अश्लील चाळे केल्याचे पत्नीने पाहिले होते. त्याने मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले होते. पत्नीने आरोपीला जाब विचारला. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिने त्याचा मोबाइल संच घेतला. तेव्हा त्याने तिच्या हातातील मोबाइल संच हिसकावून जमीनीवर आपटला त्यानंतर त्याने पुन्हा मुलीशी अश्लील कृत्य केले. पत्नीने जाब विचारल्यानंतर त्याने तिला मारहाण केली. तिने पोलिसांकडे तक्रार दिली. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indecent molestation father with two and a half year old daughter father arrested pune print news rbk 25 ysh