पुणे : आगामी लोकसभा निवडणूक ‘इंडिया’ आघाडी एकत्रितपणे लढविणार असल्याने या आघाडीचा मेळावा पुण्यात शनिवारी (२४ फेब्रुवारी) होणार आहे. पुण्यासह बारामती आणि शिरूर लोकसभा निवडणुकीचा एल्गार या माध्यमातून केला जाणार असून, शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा >>> पुण्यात घरांची विक्री जोरात! जाणून घ्या कोणत्या घरांना पुणेकरांची मिळतेय पसंती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक बुधवारी मोदी बाग येथे झाली. त्या वेळी इंडिया आघाडीचा महामेळावा घेण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला नवे नाव आणि चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यामुळे हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असून, शरद पवार मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. मित्रपक्षाच्या प्रमुख नेत्यांनाही या बैठकीत सहभागी करून घेतले जाणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार असून, त्यामध्ये नियोजन केले जाणार आहे.