‘आर्ट इंडिया फाउंडेशन‘चे संस्थापक, ‘इंडिया आर्ट गॅलरी’चे संचालक आणि खुला आसमान या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे संयोजक मिलिंद साठे (वय ६० ) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी मध्यरात्रीनंंतर निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी डॉ. प्राची साठे, मुलगा, वडील असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “मी तर मंत्री, मी कशाला मंत्रीमंडळ विस्ताराची वाट पाहू”; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मिश्किल टिप्पणी

मिलिंद साठे यांची अलीकडच्या काळातील ओळख त्यांच्या चित्रकलाविषयक सामाजिक उपक्रमांमुळे होती. इंडिया आर्ट गॅलरीच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकारांची प्रदर्शने भरविली. तसेच स्थानिक, युवा, होतकरू चित्रकारांना त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आर्ट इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून मुलांमध्ये कलाविषयक जाणीव आणि दृष्टिकोन वाढावा यासाठी ‘खुला आसमान’ आणि ‘अरमान’ हे दोन प्रमुख उपक्रम राबविले. खुला आसमान हे मुलांमधल्या चित्रकलेतल्या सर्जकतेला, सकारात्कतेला आणि अभिव्यक्तीला संधी देणारे व्यासपीठ आहे. तर, अरमान या व्यासपीठावर विशेष गरजा असलेल्या समाजघटकांचे आयुष्याशी सुरू असलेले संघर्ष आणि परिस्थितीला हार न जाता जपलेली सकारात्मकता याबद्दलच्या आश्वासक गोष्टींचा संग्रह आहे.

हेही वाचा- पुणे : पोलिसांच्या तत्परतेमुळे तेलंगणातील १३ वर्षांची मुलगी सुखरूप, खडकी पोलिसांनी मुलीला कुटुंबीयांकडे सोपविले

साठे यांनी आदिवासी आणि दुर्गम भागातली मुले, कर्करोगपीडित मुले (टाटा कॅन्सर संशोधन केंद्राबरोबर) आणि थॅलासेमिया आजार झालेली मुले (रेड क्रॉसबरोबर) यांच्यासाठी चित्रकलाविषयक आश्वासक उपक्रमांचे आयोजन केले होते. ‘सीएसआर वर्ल्ड’ या व्यासपीठामार्फत त्यांनी सामाजिक उत्तरदायित्व आणि चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये समन्वय घालून दिला.

हेही वाचा- पुण्यात लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

मिलिंद साठे यांचे शिक्षण ज्ञान प्रबोधिनी, फर्ग्युसन महाविद्यालय, दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेज आणि सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या संस्थांमध्ये झाले. लिंक सॉफ्टवेअर आणि न्यू मीडिया व्हेंचर्स या त्यांच्या स्वतःच्या दोन कंपन्यांमार्फत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गेली २५ वर्षे उद्योजक म्हणून ते कार्यरत होते. प्रवास, सायकलिंग, छायाचित्रण, इतिहास आणि संवादमाध्यमे यामध्ये त्यांना रस होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India art gallery director milind sathe passes away pune print news vvk 11 dpj